'सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहात पण...', मानसी नाईकची लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 17:13 IST2022-01-19T17:12:30+5:302022-01-19T17:13:02+5:30
मानसी नाईक (Manasi Naik) आणि प्रदीप खरेरा (Pradeep Kharera) यांच्या लग्नाला आज १ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने मानसीने स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.

'सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहात पण...', मानसी नाईकची लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट
अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसे खास आहे. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा (Pradeep Kharera) यांच्या लग्नाला आज १ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने मानसी नाईकने स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
मानसी नाईक हिने प्रदीप खरेरा सोबतचे लग्नातील काही क्षण शेअर करून लिहिले की, सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहात पण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. लव्ह यू माय किंग. प्रदीप खरेरा, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मानसी नाईकच्या या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
मानसी नाईक लग्नाच्या वाढदिवसाच्या आधीपासूनच लग्नातील सर्व विधी आणि सेरेमनीतील अविस्मरणीय क्षण चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. ती लग्नसराईतील त्या आठवणीत रमताना दिसते आहे.
१९ जानेवारी, २०२१ला मानसी व प्रदीप अडकले लग्नबेडीत
मानसी नाईक व प्रदीप खरेरा दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. अखेर १९ जानेवारी, २०२१ला मानसी व प्रदीप लग्नबंधनात अडकले. मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. मानसी आणि प्रदीप सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.