मराठीत यावर्षी आकाश ठोसर की नाना पाटेकर कोणाला मिळाली प्रेक्षकांची अधिक पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 15:58 IST2016-12-27T15:58:43+5:302016-12-27T15:58:43+5:30

2016साली सैराट, नटसम्राट, वजनदार, व्हेंटिलेटर असे एकापेक्षा एक हिट चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले. या चित्रपटातील नायकांनादेखील प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर ...

This year, in the Marathi film, Akash Thosar Ki Nana Patekar got the attention of the audience more | मराठीत यावर्षी आकाश ठोसर की नाना पाटेकर कोणाला मिळाली प्रेक्षकांची अधिक पसंती

मराठीत यावर्षी आकाश ठोसर की नाना पाटेकर कोणाला मिळाली प्रेक्षकांची अधिक पसंती

2016
साली सैराट, नटसम्राट, वजनदार, व्हेंटिलेटर असे एकापेक्षा एक हिट चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले. या चित्रपटातील नायकांनादेखील प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले. जाणून घेऊया या वर्षात कोणत्या नायकाला प्रेक्षकांची सगळ्यात जास्त पसंती दिली.

नाना पाटकेर
नाना पाटेकर यांनी नटसम्राट या चित्रपटाद्वारे कित्येक वर्षांनंतर मराठीत पुनरागमन केले. या चित्रपटातील त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला. नाना पाटेकर हे अभिनयाचे शहेनशहा आहेत हे त्यांनी या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा सिद्ध केले

Nana Patekar in Natsamrat.

आकाश ठोसर
सैराट हा आकाशचा पहिलाच चित्रपट होता. पण या चित्रपटात त्याने साकारलेल्या परशा या भूमिकेचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले. परशा या भूमिकेनंतर सध्या त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. अनेक चित्रपट केल्यानंतरही कलाकारांना जी लोकप्रियता मिळत नाही, ती लोकप्रियता आकाशला केवळ एका चित्रपटातून मिळाली.

Aakash thosar in sairat

जितेंद्र जोशी
व्हेंटिलेटर या चित्रपटात जितेंद्रने साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनीच नव्हे तर समीक्षकांनीदेखील कौतुक केले. या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळा जीतू पाहायला मिळाला होता.

Jitendra Joshi in Ventilator

आशुतोष गोवारिकर
आशुतोष गोवारिकरने नव्वदच्या दशकात काही मराठी चित्रपटांत काम केले होते. पण दिग्दर्शन, निर्मितीकडे वळल्यानंतर तो काहीसा अभिनयापासून दूर गेला. व्हेंटिलेटर या चित्रपटाद्वारे तो कित्येक वर्षांनंतर अभिनयाकडे वळला. व्हेंटिलेटरमध्ये त्याने खूपच चांगला अभिनय केला. 

Ashutosh Gowarikar in Ventilator

मंगेश देसाई
एक अलबेला या चित्रपटात मंगेश देसाईने भगवानदादाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला असला तरी प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी मंगेशच्या भूमिकेचे कौतुक केले.

Mangesh Desai in Ek Albela

Web Title: This year, in the Marathi film, Akash Thosar Ki Nana Patekar got the attention of the audience more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.