​मंदार चोळकर सरगमसाठी बनला लेखक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 17:36 IST2017-03-11T12:06:36+5:302017-03-11T17:36:36+5:30

मंदारने त्याच्या कारकिर्दीत आजवर अनेक गीते लिहिली आहेत. त्याच्या सगळ्याच गीतांना लोकांनी डोक्यावर घेतले आहे. त्याने चित्रपटांच्या गाण्यासोबतच मालिकांची ...

Writer of Mandar Cholkar Sargam | ​मंदार चोळकर सरगमसाठी बनला लेखक

​मंदार चोळकर सरगमसाठी बनला लेखक

दारने त्याच्या कारकिर्दीत आजवर अनेक गीते लिहिली आहेत. त्याच्या सगळ्याच गीतांना लोकांनी डोक्यावर घेतले आहे. त्याने चित्रपटांच्या गाण्यासोबतच मालिकांची शीर्षकगीतेदखील लिहिली आहेत. आता एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सरगम या कार्यक्रमाच्या भागांचे तो सध्या लिखाण करत आहे. त्यामुळे आता तो गीतकार असण्यासोबतच लेखकदेखील बनला आहे. याविषयी मंदार सांगतो, उर्मिला कानेटकर- कोठारे या कार्यक्रमाची सूत्रसंचालक असण्यासोबतच त्यांच्या कोठारे कुटुंबाने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. सरगम या कार्यक्रमासाठी मला त्यांच्याकडूनच विचारण्यात आले. सुरुवातीला हे काम मला खूप कठीण वाटले होते. पण आता मला या सगळ्या गोष्टी खूप सोप्या वाटायला लागल्या आहेत. या कार्यक्रमात येणाऱ्या दिग्गजांविषयी माहिती या कार्यक्रमाद्वारे दिली जाते. त्यांच्याविषयी माहिती गोळा करणे, त्यांचे किस्से गोळा करणे, त्यांच्यासोबत गप्पा मारून त्यांची गुपिते जाणून घेणे अशा गोष्टी करण्यासाठी त्यांच्यासोबत ज्याने काम केले आहे अशा व्यक्तीचा निर्मात्यांना शोध होता. मी यातील अनेकांसोबत काम केले असल्याने माझे त्यांच्यासोबत चांगले ट्युनिग आहे असे वाटले असल्याने मला या कार्यक्रमात संधी मिळाली. हे काम करायला खूप मजा येत आहे आणि त्यातून खूप काही शिकायला मिळत आहे. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्यावेळीदेखील मी तिथे असतो. काही करेक्शन्स असतील तर त्या तिथेच सेटवर केल्या जातात. पूर्वी असे कार्यक्रम हे वेळखाऊ आहेत, यापासून दूर राहिले पाहिजे असे मला वाटत होते. पण आता मी हे एन्जॉय करत आहे आणि विशेष म्हणजे हे सगळे करताना माझी गाणी लिहिणेदेखील सुरूच आहे.  तसेच सरगमचे शीर्षकगीतदेखील मीच लिहिले आहे. 

Web Title: Writer of Mandar Cholkar Sargam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.