वैभव करणार अॅक्शन चित्रपट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 16:58 IST2016-07-02T11:28:18+5:302016-07-02T16:58:18+5:30
चीटर, कॉफी आणि बरचं काही, मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी असे अनेक सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता वैभव तत्ववादी याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता ही सर्वाना लागली असणार हे नक्की. पण ही उत्सुकता आपल्याला काही दिवसच पाहावी लागणार असल्याचे कळते. कारण वैभवने सोशलमिडीयावर एक फोटो अपलोड केला आहे

वैभव करणार अॅक्शन चित्रपट?
चीटर, कॉफी आणि बरचं काही, मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी असे अनेक सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता वैभव तत्ववादी याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता ही सर्वाना लागली असणार हे नक्की. पण ही उत्सुकता आपल्याला काही दिवसच पाहावी लागणार असल्याचे कळते. कारण वैभवने सोशलमिडीयावर एक फोटो अपलोड केला आहे. त्याचबरोबर त्याने न्यू फिल्म न्यू लूक असे स्टेटस देखील अपडेट केले आहे. तसेच त्याने मार्शल आर्टस करतानाचे काही व्हिडीओ देखील अपडेट केले आहे. त्यामुळे त्याचा आगामी चित्रपट हा अॅक्शन सीनवर आधारित असण्याची दाट शक्यता आहे. त्याचा आणि अभिनेत्री पूजा सावंतचा लव्ह एक्सप्रेस हा चित्रपट देखील येणार असल्याची चर्चा आहे. पण वैभवने या चित्रपटाचा आणि लव्ह एक्सप्रेसचा काही संबंध नसल्याचे लोकमत सीएनएक्सला सांगितले. त्यामुळे लव्ह एक्सप्रेस व अॅक्शनवर आधारित असणाºया या दोन चित्रपटांमधून वैभव झळकणार आहे. त्यामुळे हे दोन चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
{{{{twitter_video_id####
}}}}I fear not the man who has practiced 10000 kicks once,but has practiced 1 kick 10000 times-Bruce Lee
#fitness#kalari pic.twitter.com/wrRWMzLsbT— Vaibbhav Tatwawdi (@vaibbhavt) June 18, 2016