सोशल नेटवर्किंग साईटवर संस्कृती बालगुडे काय शेअर करतेय सुमेध मुदगलकरसोबतचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 15:32 IST2018-11-02T15:30:30+5:302018-11-02T15:32:39+5:30
संस्कृती बालगुडे आपल्या इन्स्टाग्राम अकांऊंटवर तर नेहमीच खूप अॅक्टिव्ह असते आणि गेले काही दिवस तिच्या इन्स्टापोस्ट आणि स्टोरीज या अभिनेता सुमेध मुदगलकरविषयी जास्त असतात.

सोशल नेटवर्किंग साईटवर संस्कृती बालगुडे काय शेअर करतेय सुमेध मुदगलकरसोबतचे फोटो
संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. संस्कृती गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर काम करत असून तिची लोकप्रियता प्रचंड आहे. ती सध्या काय करतेय हे जाणून घ्यायची तिच्या फॅन्सना नेहमीच उत्सुकता असते आणि त्यामुळे ते तिला सोशल नेटवर्किंग साईटवर फॉलो करतात.
संस्कृती बालगुडे आपल्या इन्स्टाग्राम अकांऊंटवर तर नेहमीच खूप अॅक्टिव्ह असते आणि गेले काही दिवस तिच्या इन्स्टापोस्ट आणि स्टोरीज या अभिनेता सुमेध मुदगलकरविषयी जास्त असतात. अशावेळी अर्थातच तिच्या फॉलोवर्सना सध्या तिच्यात आणि सुमेधमध्ये नक्की काय सुरू आहे, याची खूप उत्सुकता लागली आहे.
सिनेसृष्टीतल्या सुत्रांच्या अनुसार, संस्कृती आणि सुमेधची नुकत्याच एका प्रोजेक्टच्या निमित्ताने मैत्री झाली. दोघंही समवयस्क असल्याने मैत्री ही प्रोजेक्टपुरती न राहता, मग या मैत्रीचे रूपांतर घट्ट मैत्रीत झाले. त्यामुळे फक्त संस्कृतीच नाही तर सुमेधच्याही इन्स्टापोस्ट आणि स्टोरीजमध्ये अधूममधून संस्कृतीचे मेन्शन्स असतात.
सुमेधच्या जवळच्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, सुमेध आणि संस्कृतीने आत्तापर्यंत एकत्र सिनेमा केला नसला तरीही दोघेही एकमेकांसोबत खूप छान दिसतात. ‘बबली गर्ल’ संस्कृती आणि चॉकलेट बॉय सुमेध एक क्युट कपल बनू शकतात आणि लवकरच हे दोघेही एका रोमँटिक म्युझिक अल्बममध्ये एकत्र दिसणार असून या अल्बमचे चित्रीकरण देखील पूर्ण झाले आहे.
संस्कृती बालगुडेला यासंदर्भात विचारले असता ती हसून सांगते, “हो सुमेध आणि मी नुकताच एक व्हिडीयो अल्बम शूट केलाय. उत्तम लोकेशन्स, श्रवणीय संगीत असलेला हा म्युझिक अल्बम लवकरच तुमच्या भेटीला येईल. “
फिल्म इंडस्ट्रीतल्या या फ्रेश जोडीची सिझलींग केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता आता नक्कीच दोघांच्याही चाहत्यांना लागली असेल यात काहीच शंका नाही.