गश्मिर का आहे सध्या आनंदात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 12:55 IST2016-12-07T12:55:20+5:302016-12-07T12:55:20+5:30

सध्या मराठी इंडस्ट्रीचे वातावरणच आनंदी आनंद गडे आहे. एकीकडे सनई चौघडे वाजत आहेत. तर दुसरीकडे कलाकार हे पुरस्काराने आनंदित ...

Why is Gashmir presently happy? | गश्मिर का आहे सध्या आनंदात

गश्मिर का आहे सध्या आनंदात

्या मराठी इंडस्ट्रीचे वातावरणच आनंदी आनंद गडे आहे. एकीकडे सनई चौघडे वाजत आहेत. तर दुसरीकडे कलाकार हे पुरस्काराने आनंदित झाले आहेत. अशीच काहीशी परिस्थिती अभिनेता गश्मिर महाजनीची झाली आहे. गश्मिरला पहिल्यांदा उत्कृष्ट कलाकार म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे सध्या गश्मिरचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याच्या या आनंदाविषयी गश्मिर लोकमत सीएनएक्सला सांगतो, खरं सागू का या पुरस्कारावेळी मी उपस्थित नव्हतो. माझा हा पुरस्कार माझ्या आई वडिलांनी स्वीकारला आहे. या पुरस्कारावेळी मी बाहेरगावी होतो. मात्र हा पहिला पुरस्कार घेताना उपस्थित नव्हतो याचे वाईट वगैरे काही वाटले नाही. याउलट तो आई वडिलांनी माझा पहिला फिेल्मफेअर पुरस्कार स्वीकारला याचा अधिक आनंद होत आहे. तसेच या पुरस्कारामुळे अधिक काम करण्याचे प्रोत्साहन मिळाले आहे. कारण प्रत्येक कलाकाराला प्रत्येक पुरस्कार हा त्याच्या यशाची पावती असते. या पुरस्काराने अधिक हिरावून न जाता अधिक मेहनत करण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. येथेच न थांबता खूप मेहनत घेणार असल्याचेदेखील त्याने यावेळी सांगितले. गश्मिर याने नुकतेच बॉलिवुडमध्ये पदापर्ण केले आहे. त्याचा डोंगरी का राजा हा बॉलिवुड चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर या चित्रपटात गश्मिरसोबत बॉलिवुडची तगडी अभिनेत्री सनी लिओनीदेखील ठुमके लावताना प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तसेच त्याने मराठी चित्रपटसृष्टीला देऊळ बंद, कान्हा, वन वे तिकीट असे अनेक सुपरहीट चित्रपटदेखील दिले आहेत. तसेच सध्या तो अनेक चित्रपटांच्या प्रोजेक्टमध्ये बिझी असल्याचेदेखील समजत आहे. 


Web Title: Why is Gashmir presently happy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.