​ सौरभ लावणार कोणाचा छडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 13:59 IST2016-11-20T14:01:26+5:302016-11-29T13:59:11+5:30

                अभिनेता सौरभ गोखले आता कोणाचा छडा लावणार हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित ...

Whose stick would you like? | ​ सौरभ लावणार कोणाचा छडा?

​ सौरभ लावणार कोणाचा छडा?

 
            अभिनेता सौरभ गोखले आता कोणाचा छडा लावणार हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला आहे. अहो त्याला कारणही तसेच आहे, लवकरच सौरभ छडा नावाच्या एका आगामी नाटकातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना दिसणार आहे. परंतू आता तो यावेळी कोणाचा छडा लावणार कि त्याचा छडा कोणी लावणार याचे उत्तर काही मिळालेले नाही. परंतू नावा वरुन तरी या नाटकामध्ये काहीतरी सस्पेंस असल्याचेच समजतेय. यामध्ये सौरभ प्रेक्षकांना एका वेगळ््या भूमिकेत नक्कीच पाहायला मिळणार आहे. काही चुका आयुष्यभर तुमची पाठ सोडत नाहीत अशी टॅगलाईन आपल्याला या नाटकाच्या पोस्टवरच दिसत आहे. त्यामुळे चुकांच्या चाकोरीमध्ये सापडलेल्या माणसाची गोष्ट यामध्ये प्रेक्षकांना दिसू शकते. या नाटकाच्या पोस्टरवर सौरभ ट्रेस झालेला दिसून येतोय. पोस्टर पाहताच नक्कीच तो काणत्यातरी गोष्टीत अडकलाय याची जाणीव होते. सौरभ सोबतच आपल्याला या नाटकात रेश्मा रामचंद्र, मानसी कुलकर्णी आणि वेदांगी कुळकर्णी पाहायला मिळती. नाटकाचे लेखन सुरेश जयराम यांनी केले आहे. तर या नाटकाचे दिग्दर्शक मंगेश कदम आहेत. तर राहुल रानडे यांचे संगीत या नाटकाला असणार आहे. लवकरच या नाटकाचा पहिला प्रयोग ठाण्यामध्ये गडकरी नाट्यगृहात होणार असल्याचे समजतेय. सौरभने याआधी अनेक नाटकांमध्ये काम करुन रंगभूमीवर स्वत:च्या अभिनयाची छाप सोडलीच आहे. नुकतेच त्याचे प्लेझंट सरप्राईज नावाचे नाटक  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. या नाटकामध्ये सौरभची अभिनेत्री प्राजक्ता माळी सोबत झक्कास जोडी जमली होती. आता छडा या नवीन नाटकामध्ये सौरभने कशा प्रकारची भूमिका साकारली आहे. कि प्रेक्षकांना तो या नाटकात निगेटिव्ह भूमिकेत दिसणार हे तर आपल्याला नाटक रंगमंचावर आल्यावरच समजेल. 
       
     

Web Title: Whose stick would you like?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.