दुनियादारीतील सॉरीने कोणाशी केले लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 13:07 IST2016-12-26T13:07:02+5:302016-12-26T13:07:02+5:30
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सनई-चौघडे वाजू लागल्याचे आपण अनेक दिवसांपासून पाहत आहोतच. बºयाच कलाकारांनी या वर्षी लग्नबंधनात अडकण्याचे जणु काही ...

दुनियादारीतील सॉरीने कोणाशी केले लग्न
स ्या मराठी चित्रपटसृष्टीत सनई-चौघडे वाजू लागल्याचे आपण अनेक दिवसांपासून पाहत आहोतच. बºयाच कलाकारांनी या वर्षी लग्नबंधनात अडकण्याचे जणु काही ठरविलेलेच होते. या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात मात्र अनेक कलाकारांनी दोनाचे चार हात केले. आता त्यामध्ये अजुन एका कलाकाराची भर पडली आहे. दुनियादारी या चित्रपटामध्ये जरी आपल्याला प्रमुख भूमिकेती स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी हे कलाकार माहित असतील. तरी देखील या चित्रपटामधील दोस्तोंकी दुनियादारी म्हणणारे खरे मित्र सुद्धा तेवढेच लक्षात राहतात. या चित्रपटामध्ये मध्ये सॉरी ही व्यक्तिरेखा साकारलेला अभिनेता प्रणव रावराणे नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. दुनियादारी या चित्रपटामध्ये प्रणवने सॉरीचे पात्र एकदम झक्कास साकारले होते. त्या चित्रपटानंतर प्रणव मात्र फारसा कुठे दिसलाच नाही. पण आता त्याने लग्न करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. होय, प्रणवने स्टार प्रवाह या मालिकेतील एक अभिनेत्री अमृता सकपाळ हिच्या सोबत लग्न केले आहे. नुकतेच प्रणव आणि अमृताचे लग्न झाले आहे. या दोघांच्याही लग्नाचे काही खास फोटो सध्या सोशल साईट्सवर व्हायरल झाले आहेत. प्रणव अनेक नाटके, चित्रपट आणि कार्यक्रम करण्यात व्यस्त असतो. प्रणवने रंगभूमीवरील बºयाच नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. दुनियादारी या चित्रपटातील त्याच्या सॉरी या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटानंतर त्याला रसिक प्रेक्षक अोळखू लागले आणि या कलाकाराला खरी ओळख मिळाली. प्रणवला त्याच्या भावी आयुष्यासाठी च्गत्यांकडून खुप खुप शुभेच्छा.
![]()
![]()