सोनालीला कोणासोबत करायचेय काम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2016 10:51 IST2016-11-12T16:57:03+5:302016-11-14T10:51:25+5:30
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या चतुरस्त्र अभिनयामुळे ओळखली जाते. मराठी आणि बॉलिवूडमध्ये सतत दर्जेदार भूमिका ...

सोनालीला कोणासोबत करायचेय काम?
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या चतुरस्त्र अभिनयामुळे ओळखली जाते. मराठी आणि बॉलिवूडमध्ये सतत दर्जेदार भूमिका साकारुन सोनालीने तिचे चित्रपटसृष्टीतील स्थान बळकट केले आहे. सोनालीने अनेक आघाडीच्या कलाकारांसोबत आजपर्यंत चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु सोनालीला कोणासोबत काम करण्याची इच्छा आहे, हे तुम्हाला माहित आहे का ? प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते कि आपण या अभिनेत्यासोबत किंवा अभिनेत्री सोबत मोठ्या पडदयावर काम करावे. प्रत्येकाचेच कोणी ना कोणी आवडते कलाकार असतात. आता हेच पाहा ना ज्या सोनालीसोबत काम करण्यासाठी हजारोजण वाट पाहत आहेत, त्या सोनालीला मात्र एका अभिनेत्यासोबत काम करायची इच्छा आहे. आता तुम्ही म्हणाल कि असा कोणता भाग्यवान अभिनेता आहे कि ज्याच्या सोबत सोनालीला काम करायचेय. तर हा अभिनेता आहे सुनील बर्वे. सोनालीने नुकतेच याविषयी सोशल मीडियावर सांगितले आहे. सोनाली लिहिेते, मला सुनीलसोबत काम करण्याची इच्छा आहे आणि मी त्यासाठी चांगल्या संधीच्या शोधात आहे. आता सोनालीने सुनील सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे म्हटल्यावर नक्कीच आपल्याला ही नवीन जोडी मोठ्या पडदयावर दिसूही शकते. आता सोनालीची ही इच्छा कधी पूर्ण होतेय याच्या प्रतिक्षेत तर तिचे चाहतेही नक्कीच असतील. याविषय सुनील काय म्हणतोय हे तरी अजुन समजले नाही. परंतु सोनाली सारख्या अभिनेत्री सोबत जर सुनीलला काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच त्यालाही आनंद होईल.