कोण होतीस तू, काय झालीस तू..! अभिनेत्री अलका कुबल यांची अवस्था पाहून हैराण झाले चाहते
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 16:31 IST2025-04-12T16:30:29+5:302025-04-12T16:31:00+5:30
Alka Kubal : अभिनेत्री अलका कुबल यांचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत त्यांचे वजन वाढल्याचे दिसून येत आहे.

कोण होतीस तू, काय झालीस तू..! अभिनेत्री अलका कुबल यांची अवस्था पाहून हैराण झाले चाहते
अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. माहेरची साडी या सिनेमातून त्या घराघरात पोहचल्या. आजही प्रेक्षक हा सिनेमा तितक्याच आवडीने पाहतात. अभिनेत्रीचा आताही खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. त्या सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतात. दरम्यान नुकताच त्यांचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत.
अभिनेत्री अलका कुबल यांचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत त्यांचे वजन वाढल्याचे दिसून येत आहे. त्यांचा हा फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत. त्यांना काय झालं आहे, त्यांची अशी का अवस्था झाली आहे, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. आम्ही तुम्हाला खरं काय ते सांगतो. त्यांना काहीच झालेले नाही. त्यांचा हा फोटो त्यांच्या आगामी प्रोजेक्टमधला आहे. त्या लवकरच एका नवीन नाटकात पाहायला मिळणार आहेत. या नाटकाचं नाव आहे वजनदार. यातील त्यांचा लूक सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
अलका कुबल यांनीदेखील इंस्टाग्रामवर नाटकाचे पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये त्या जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिले की, 'वजनदार' नवं कोरं नाटक.. २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगमंचावर येतेय..नाटकाला नक्की या.. तुमचं प्रेम आणि आशिर्वाद पाठीशी असू द्या.. बाप्पा मोरया.. त्यांच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ही पोस्ट पाहून चाहते नाटक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
वजनदार नाटकाचं पोस्टर पाहून हे नाटक एका महिलेवर आधारीत आहे, जी वजन घटवण्यासाठी काय-काय प्रयत्न करणार आणि त्या प्रवासात तिला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल, हे पाहायला मिळणार आहे. या नाटकाचे लेखन संपदा जोगेळेकर-कुळकर्णीने केले आहे. यात अलका कुबल यांच्या व्यतिरिक्त अभिषेक देशमुख, साक्षी पाटील, अभय जोशी आणि पूनम सरोदे हे कलाकार दिसणार आहेत.