'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या अवॉर्ड सोहळयाला कलाकार लावणार चार चाँद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 14:31 IST2017-02-21T09:01:48+5:302017-02-21T14:31:48+5:30

बॉलिवुड असो या मराठी अवॉर्ड हे शो पाहण्यासाठी कलाकारांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. कलाकार या अवॉर्ड शोला कोणत्या स्टाईलमध्ये येणार ...

'Who is Maharashtra's favorite?' The artist will bring the four stars to the award ceremony | 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या अवॉर्ड सोहळयाला कलाकार लावणार चार चाँद

'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या अवॉर्ड सोहळयाला कलाकार लावणार चार चाँद

लिवुड असो या मराठी अवॉर्ड हे शो पाहण्यासाठी कलाकारांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. कलाकार या अवॉर्ड शोला कोणत्या स्टाईलमध्ये येणार यापसून ते कलाकार कोणत्या गाण्यवर थिरकणार याची वाट प्रेक्षक आवर्जुन करत असतात. असाच एक अवॉर्ड सोहळा प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा अवॉर्ड सोहळा असे याचे नाव आहे. सोमवारी (20 फेब्रुवारी) मुंबईतील हयात रिजेन्सी हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडणार आहे. या अवॉर्ड शोचे यंदाचे हे आठवे वर्ष आहे. या सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. अभिनेते महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, छाया कदम, जयवंत वाडकर, श्रेयस तळपदे, अमेय वाघ, संस्कृती बालगुडे, केतकी माटेगांवकर, अश्विनी भावे यांच्यासह मराठीतील अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित होते. त्यामुळे या कलाकारांनी या अवॉर्ड सोहळयाला चार चाँद लावले असे म्हणण्यास हरकत नाही. 
       
      यंदाच्या या अवॉर्ड शोला सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते आर्ची आणि परशा अर्थातच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या लोकप्रिय कलाकारांनी. या नवोदित कलाकारांनी सैराट या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन नऊ महिने झाले असले तरी, आज ही या कलाकारांची जादू तशीच प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. या कलाकारांना पाहण्यासाठी अक्षरश: गर्दी होते. तर चित्रपट प्रदर्शितनंतर काही चाहत्यांनी तर थेट रिंकूचेच घर गाठले होते. प्रेक्षकांच्या अशा या लाडक्या जोडीचा झक्कास परफॉर्मन्स या सोहळयात सादर होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकदेखील अधिक उत्सुक असल्याचे दिसत आहे. 




Web Title: 'Who is Maharashtra's favorite?' The artist will bring the four stars to the award ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.