कोण आहे सई ताम्हणकरचा आवडता क्रिकेटर? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 18:35 IST2023-10-08T18:30:06+5:302023-10-08T18:35:38+5:30
अलिकडेच सईने इन्स्टाग्रामवर ‘Ask me a Question’ हे सेशन ठेवलं होतं.

Sai Tamhankar
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि हॉट अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. केवळ मराठीच नाही तर तिने बॉलिवूडमध्ये काही चित्रपटात काम केले आहे. वेगवेगळ्या भूमिकासाकारुन सईने चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. ती स्वतः आपल्या खासगी आयुष्याबाबत उघडपणे बोलताना दिसते.
अलिकडेच सईने इन्स्टाग्रामवर ‘Ask me a Question’ हे सेशन ठेवलं होतं. यावेळी तिने चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यामध्येच तिचा आवडता क्रिकेटर कोणता असा प्रश्न चाहत्याने तिला केला. यावर सईने आपला आवडता क्रिकेटर 'जिजाजी विराट कोहली आणि एम.एस. धोनी' असल्याचे सांगितलं.
सई सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आज सई कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात ती परिक्षकाच्या भूमिकेत आहे. शिवाय, सईने मुंबईत नुकतेच स्वत:चे घर खरेदी केले आहे. सईने तिच्या या आलिशान घराची झलक व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केली आहे. आतापर्यंत तिने एकूण १० घरे बदलली. मात्र, आता तिने अकरावे घर स्वतःचे हक्काचे असे विकत घेतले आहे.