कोणत्या विषयावर भाष्य करणार हा चित्रपट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 16:35 IST2016-11-30T16:35:03+5:302016-11-30T16:35:03+5:30
सध्या मराठीमध्ये अनेक वेगवेगळे विषय येत आहेत. मराठी चित्रपट हा आशयघन असल्याचे नेहमीच बोलले जाते. खरेतर आपल्या चित्रपटांच्या कथा ...

कोणत्या विषयावर भाष्य करणार हा चित्रपट?
ध्या मराठीमध्ये अनेक वेगवेगळे विषय येत आहेत. मराठी चित्रपट हा आशयघन असल्याचे नेहमीच बोलले जाते. खरेतर आपल्या चित्रपटांच्या कथा दर्जेदार असल्याने प्रेक्षक मराठी चित्रपट पाहण्यासाठी आता थिएटर्समध्ये जाऊ लागले आहेत. तर मराठी चित्रपट सातासमुद्रापार देखील पोहचला आहे. असाच एक वेगळ््या विषयावरील चित्रपट घेऊन दिग्दर्शक प्रकाश कुंटे सज्ज झाले आहेत. या चित्रपटासाठी त्यांची भन्नाट कलाकार निवडले आहेत. सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, ललित प्रभाकर आणि प्रियदर्शन जाधव या कलाकारांना या चित्रपटात प्रेक्षकांना एकत्र पहायला मिळणार आहे. प्राजक्ता आणि ललितने एका मालिकेमध्ये याआधी काम केले आहेत. त्यामुळे या चित्रपटासाठी या दोघांच्या पुन्हा आकदा रेशीमगाठी जुळल्या आहेत. तर सोनाली आणि प्रियदर्शन प्रथमच एकत्र काम करीत असल्याने या चौघांची झक्कास केमिस्ट्री आपल्याला चित्रपटात पहायला मिळेल यात काही शंकाच नाही. चित्रपटाचे नाव अजून तरी समोर आलेले नाही. परंतू हा चित्रपट एका भावनिक विषयाशी निगडीत असल्याचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी सांगितले आहे. कर्नाटकातील हंपी या ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. सर्वच कलाकार हंपीला रवाना झाले आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील लवकरच या चित्रीकरणासाठी हंपीला जाणार आहे. १७ तारखेपर्यंत तिचे चित्रीकरण असल्याचे प्राजक्ताने लोकमत सीएनएक्सशी संवद साधताना सांगितले.