कोणत्या चित्रपटाच्या माध्यमातून विवेक करतोय मराठीत पदार्पण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 14:05 IST2016-11-18T17:55:14+5:302016-11-19T14:05:21+5:30

        मराठी चित्रपट आता ग्लोबल झाला आहे. सातासमुद्रापार गेला आहे. मराठी चित्रपटांचे शोज परदेशात होऊ लागलेत. ...

Which film is Vivek, debut in Marathi? | कोणत्या चित्रपटाच्या माध्यमातून विवेक करतोय मराठीत पदार्पण ?

कोणत्या चित्रपटाच्या माध्यमातून विवेक करतोय मराठीत पदार्पण ?

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">        मराठी चित्रपट आता ग्लोबल झाला आहे. सातासमुद्रापार गेला आहे. मराठी चित्रपटांचे शोज परदेशात होऊ लागलेत. तर अनेक कलाकारांना मराठी चित्रपटसृष्टी खुणावू लागली आहे. आज अनेक हिंदी चित्रपटातील कलाकार मराठी सिनेमांमध्ये काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी त्यांची ही इच्छा जाहीरपणे बोलूनही दाखविली आहे. अभिनेता विवेक ऑबेरायदेखील आता लवकरच आपल्याला एका मराठी चित्रपटात दिसणार आहे. रितेश देखमुखच्या आगामी मराठी सिनेमात विवेकची वर्णी लागली असल्याचे समजतेय. याविषयी विवेकनेच सर्वांसमोर खुलासा केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान विवेकने तो लवकरच मराठी सिनेमा करणार असल्याचे बोलून दाखविले आहे.  रितेशने मला एका मराठी सिनेमाची कथा ऐकवली आहे. मला ती कथा फारच आवडली. मी लगेचच रितेशला हा सिनेमा करणार असल्याचे सांगितले आहे. सध्या या चित्रपटाच्या कथेवर काम सुरु आहे. सर्व गोष्टी लवकरच जुळून येतील असे विवेकने सांगितले आहे. एवढेच नाही तर रितेशने देशमुखने सांगितल्यावर लगेचच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यार असल्याचे देखील त्याने सांगितले अहे. विवेक अणि रितेश एकमेकांचे अतिशय चांगले मित्र आहेत. या दोघींनी अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम देखील केले आहे. तर विवेकचा हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याने त्याच्या मराठमोळ्या चाहत्यांसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी असेल. या चित्रपटासाठी विवेक मराठीचे धडे गिरवणार का? हे तर आपल्याला लवकरच समजेल. रितेश सध्या फास्टर फेणे या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. आता विवेक आपल्याला याच चित्रपटात अभिनय करताना दिसणार का?  हा प्रश्न देखील उपस्थित होतो. पण ते काहीही असले तरी विवेकचा मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना लवकरच दिसणार हे मात्र खरे.

Web Title: Which film is Vivek, debut in Marathi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.