कोणत्या पुस्तकातून प्रेरित होऊन लिहिला शिवानीने लघुपट ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2016 17:27 IST2016-11-17T17:27:46+5:302016-11-17T17:27:46+5:30
कलाकारांचे आयुष्य हे खूप बिझी असते. नाटक, मालिका, चित्रपट यांच्या चित्रिकरणात कलाकार हे रमलेले असतात. तसेच कॅमेरा, अॅक्शन, कट, ...
.jpg)
कोणत्या पुस्तकातून प्रेरित होऊन लिहिला शिवानीने लघुपट ?
लाकारांचे आयुष्य हे खूप बिझी असते. नाटक, मालिका, चित्रपट यांच्या चित्रिकरणात कलाकार हे रमलेले असतात. तसेच कॅमेरा, अॅक्शन, कट, टेक, रिटेक या कॅमेरांच्या शब्दांच्या गर्दीत त्यांना स्वत:साठीदेखील वेळ नसतो. अशा या धावत्या युगात ही अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने मात्र आपले शेडयुल्ड सांभाळून लघुपट लिहिण्याचे काम हाती घेतल्याचे लोकमत सीएनएक्सला सांगितले. शिवानी सांगते, सीडनी शेल्डन यांचे मी एक पुस्तक वाचले. ते मला फार आवडले. सायकोलॉजिकल थ्रिलर यावर आधारित हे पुस्तक आहे. यात एका सामान्य मुलीच्या आयुष्यात कशी गुंतागुत होते ते या पुस्तकात मांडण्यात आली आहे. या गोष्टीतली सामान्य मुलगी आहे ती मला आपल्यातील वाटली. लिहिण्याची फार आवड असल्यामुळे या गोष्टीवर लघुपट लिहिण्याचा विचार केला. या पुस्तकातून प्रेरित होऊनच गेली एक ते दीड वर्षे झाले हे लघुपट लिहिण्याचे काम हाती घेतले आहे. आता हा लघुपट लिहून पूर्ण झाला आहे. पण त्यावर लुघपटाचे चित्रिकरण कधी करणार आहे हे अजून ठरविले नाही. त्याचप्रमाणे दिग्दर्शन आणि अभिनय करण्याचा विचारदेखील केला नाही. पण माझ्यासाठी लघुपट करणे हे आव्हानात्मक असले, तरी ते लिहिण्याचे आव्हान मी पूर्ण केले आहे. या गोष्टीचा आनंद झाला आहे. शिवानी यापूर्वी फुंतरू, अॅण्ड जरा हटके या चित्रपटात झळकली होती. तसेच ती सध्या बन मस्का या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांच्या पंसतीसदेखील उतरताना दिसत आहे.