आर्चीच्या बॅगेत बघुया काय काय? व्हायरल होतोय रिंकू राजगुरूचा हा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 08:00 IST2021-11-20T08:00:00+5:302021-11-20T08:00:06+5:30
Rinku Rajguru : आर्चीचा गावरान ठसका, तिचा थाट, तिच्या अदा आणि तिची बॅग...! होय, तिची बॅगही चर्चेत असते.

आर्चीच्या बॅगेत बघुया काय काय? व्हायरल होतोय रिंकू राजगुरूचा हा व्हिडीओ
आर्चीची म्हणजेच रिंकू राजगुरूची (Rinku Rajguru) एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक आजही गर्दी करतात. तिचा गावरान ठसका, तिचा थाट, तिच्या अदा आणि तिची बॅग...! होय, तिची बॅगही चर्चेत असते. आर्ची तिच्या बॅगेत नेमकं काय काय कॅरी करते, हे जाणून घेण्यासही चाहते उत्सुक आहेत आणि म्हणूनच तिचा एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होतोय.
काही महिन्यांपूर्वी ‘राजश्री मराठी’च्या युट्युब चॅनेलवर रिंकूचा ‘व्हॉट्स इन माय बॅग विद रिंकू राजगुरू’ हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. हाच व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत रिंकूने ती तिच्या कोणत्या गोष्टी कॅरी करते, याचा खुलासा केला होता. या व्हिडीओमध्ये रिंकूकडे एक काळ्या रंगाची बॅग दिसते. ही बॅग म्हणजे, रिंकूला आईकडून मिळालेलं अनमोल गिफ्ट. होय, ही बॅग रिंकूला तिच्या आईने घेऊन दिली आहे. ही बॅग आपण नेहमीच आपल्या सोबत कॅरी करत असल्याचं रिंकू व्हिडीओत सांगते.
रिंकू राजगुरूला साधेपणा भावतो. त्यामुळेच तिच्या बॅगेतसुद्धा अतिशय सहज-साध्या वस्तू पाहायला मिळतात. एक गोष्ट ती न चुकता बॅगेत कॅरी करते, ती म्हणजे पाण्याची बाटली. त्यामुळे सतत शरीरात पाणी जात राहतं. रिंकूच्या बॅगेत कॉफी मगसुद्धा हमखास सापडतो. कॉफी कपड्यावर किंवा कारमध्ये पडणार नाही, याची काळजी घेत रिंकू सतत सोबत कॉफी मग कॅरी करते. याच मगातून ती कॉफी पिते. फेसवॉश, परफ्युम या गोष्टीही ती बॅगेत आवर्जून कॅरी करते. कार्ड्स आणि पैसे ठेवण्यासाठी एक छोटीशी पर्स, तसेच पेन, रबर बँड या गोष्टीही ती सोबत ठेवते. प्रवासात गाणी ऐकण्यासाठी हेडफोनही तिच्या बॅगेत असतात म्हणजे असतातच. शिवाय स्टीलचे चमचेही तिच्या बॅगमध्ये असतात. बाहेरच्या लाकडी किंवा इतर चमच्याने खाणं तिला आवडत नाही. म्हणून जिथे जाईल तिथे ती तिचा घरचा स्टीलचे चमचे कॅरी करते... आहे ना मजेशीर!!