अमेय वाघ आणि मिथिला पारकर यांच्यात काय सुरू आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 14:45 IST2017-02-15T09:15:47+5:302017-02-15T14:45:47+5:30

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतमुळे अमय वाघ प्रसिद्धीझोतात आला. या मालिकेनंतर त्याने घंटा या चित्रपटात काम केले होते. तसेच ...

What's going on between Amey Wagh and Mithila Parker? | अमेय वाघ आणि मिथिला पारकर यांच्यात काय सुरू आहे?

अमेय वाघ आणि मिथिला पारकर यांच्यात काय सुरू आहे?

ल दोस्ती दुनियादारी या मालिकेतमुळे अमय वाघ प्रसिद्धीझोतात आला. या मालिकेनंतर त्याने घंटा या चित्रपटात काम केले होते. तसेच कास्टिंग काऊच विथ अमेय आणि निपुण, भडिपा या कार्यक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. अमेय आता त्याच्या व्यवसायिक आयुष्यासोबत त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. 
अमेयने व्हेलेंटाईन दिवसाच्या निमित्ताने फेसबुकला एक पोस्ट टाकली आहे. ही पोस्ट पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अमेयने युट्युब गर्ल मिथिला पारकरसोबत त्याचा चहा पितानाचा एक फोटो पोस्ट केला असून त्यावर फायनली माय व्हेलेंटाईन असे म्हटले आहे. या फोटोला आतापर्यंत सात हजारहूनही जास्त लाईक्स मिळाल्या आहेत तर 204 लोकांनी यावर कमेंट केली आहे. तसेच 17 जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे. अमेयने ही पोस्ट शेअर केल्यापासून मिथिला आणि त्याच्यात काही आहे का याबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेकांनी तर या पोस्टवर त्या दोघांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत आणि लोकांच्या शुभेच्छांवर अमेयने आभारदेखील मानले आहेत. पण या दोघांमध्ये खरेच काही सुरू आहे की, त्यांच्या भडिपा या कार्यक्रमाशी निगडित ही पोस्ट आहे हे अद्याप तरी कळलेले नाही. प्रमोशनसाठी विविध युक्त्या लढवण्यात अमेय हुशार आहे. अमर फोटो स्टुडिओ या नाटकाच्यावेळीदेखील अमेयने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा घडवून आणली होती. त्यामुळे अमेय आणि मिथिलामध्ये काहीतरी शिजतेय की हे कसले तरी प्रमोशन आहे याबद्दल आपल्याला अमेय किंवा मिथिलाच सांगू शकतात. 


Web Title: What's going on between Amey Wagh and Mithila Parker?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.