मनवाच्या टॅटूचं रहस्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2016 16:49 IST2016-06-13T11:19:54+5:302016-06-13T16:49:54+5:30

टॅटू हा एक ट्रेन्ड झालाय मग तो सामान्य व्यक्तीने काढलेला टॅटू असो वा सेलिब्रिटींचा टॅटू असो. टॅटू काढणे ही ...

What is the secret of Manav Tattoo? | मनवाच्या टॅटूचं रहस्य काय?

मनवाच्या टॅटूचं रहस्य काय?

class="clearfix" id="content" style="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 25.6px; font-family: FontAwesome; font-size: 16px; margin: 0px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">

टॅटू हा एक ट्रेन्ड झालाय मग तो सामान्य व्यक्तीने काढलेला टॅटू असो वा सेलिब्रिटींचा टॅटू असो. टॅटू काढणे ही फॅशन जरी असली तरी त्या टॅटू काढण्यामागे एखादी गोष्ट वा भावना असू शकते. असंच एक गुपीत आहे अभिनेत्री मनवा नाईकच्या टॅटूचं.

मनवा नाईक ने कुत्र्याच्या पंजाचं टॅटू काढलं आहे. हा टॅटू काढण्यामागचा मनवाचा विचार नेमका काय असेल, असा प्रश्न तुम्हांला पडला असेल ना?

मनवा नाईककडे १३ वर्ष कानोजी नावाचा बॉक्सर कुत्रा होता. मनवा आणि कानोजी यांच्यामधील बॉण्डिंग जास्त होती. कानोजी गेल्यानंतर त्याच्या आठवणीत मनवाने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी हा टॅटू काढला.

“टॅटू ही कानोजीची आठवण आहे. टॅटू हा आपण जगातून गेल्यानंतर पण तो सोबत घेऊन जातो. माझ्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी कानोजी माझ्यासोबत होता म्हणून तो माझ्यासाठी जवळचा आहे”, असं मनवा सांगते.

सेलिब्रिटी पण तुम्हां-आम्हां सारखेच मनाने मोकळे, साधे असतात हे मनवाच्या वक्तव्यावरुन कळलंच असेल. मनवाने काढलेल्या कानोजीच्या टॅटूला आम्हां प्रेक्षकांकडून अनेक लाईक्स!!

 
 
 
 

Web Title: What is the secret of Manav Tattoo?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.