म्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 16:33 IST2018-12-15T16:28:10+5:302018-12-15T16:33:05+5:30

रेशमची लेक रिशिका ही आपल्या आईप्रमाणेच सुंदर आणि तितकीच ग्लॅमरस आहे.रिशिकाचा एक फोटो समोर आला असून त्यात तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो आहे.

This is what makes Resham Tipnis Bindhass mom | म्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी

म्हणून रेशम टिपणीस आहे बिनधास्त मॉम, जाणून घ्या त्यांच्या खास बॉन्डींगविषयी

मराठी बिग बॉस या रियालिटी शोनंतर रेशम टिपणीस हे नाव मराठी रसिकांच्या चर्चेचा विषय बनलं. हिंदी आणि मराठी सिनेमा तसंच मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी रेशम मध्यंतरीच्या काळात तितकी चर्चेत नव्हती. मात्र बिग बॉस हा मराठी रियालिटी शोमधील एंट्रीने रेशम पुन्हा रसिकांच्या मनात घर करुन गेली. त्यामुळेच की काय तिच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. एक बिनधास्त जीवन जगणारी मुलगी अशी रेशमची ओळख आहे. स्वतःच्या मर्जीनुसार हवं तसं जीवन जगायला तिला आवडतं. 

बिग बॉस मराठीमध्येही रेशमचा हा बोल्ड, बिनधास्त आणि तितकाच फटकळ अंदाज रसिकांना भावला होता. जे आहे ते मान्य करताना तिने कधीच मागे पुढे पाहिलं नाही. जीवनातील कुठलीही खासगी गोष्ट असो किंवा मग एखादी भूमिका, रेशमला जे आवडते ते ती करते. नुकतंच सोशल मीडियावर काही जणांनी रेशमला तिची आईची जबाबदारी आणि मुलांबाबतचं कर्तव्य याची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांना रेशम आपल्या बिनधास्त अंदाजात जोरदार प्रत्युत्तर दिलं. “माझी मुलं ही कायम माझी जबाबदारी असतील. मग ते ६ वर्षाचे असो, १८ वर्षाचे असो किंवा मग ३५ वर्षांचे. माझ्या लेकीला आणि मुलाला माझी गरजअसेन तेव्हा आई म्हणून मी कायम त्यांच्यासोबत उभी असेन” अशा शब्दांत रेशमने पालकत्वाची जबाबदारीची आठवण करून देणाऱ्यांना सुनावलंय. आईचा हा बिनधास्त अंदाज पाहून रिशिका आणि मानव यांनाही अभिमान वाटेल.

रेशमची लेक रिशिका ही आपल्या आईप्रमाणेच सुंदर आणि तितकीच ग्लॅमरस आहे.रिशिकाचा एक फोटो समोर आला असून त्यात तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो आहे. आईप्रमाणेच रिशिकाही मॉडर्न विचारांची आहे. रिशिका मनमौजी आणि जीवनाचा पूर्ण आनंद घेणारी असल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.सोशल नेटवर्किंग साईटवरही रिशिका अॅक्टिव्ह असते. रेशमचा पहिला पती संजीव सेठशी घटस्फोट झालाय. असं असलं तरी संजीव आणि त्याची दुसरी पत्नी लताशी रिशिकाचे चांगलेच संबंध आहेत.रिशिका आणि लताचे फोटोही सोशल नेटवर्किंग साईटवर पाहायला मिळतात.

Web Title: This is what makes Resham Tipnis Bindhass mom