Silk Tipnis, take her look as beautiful and glamorous as you know, special things about her | रेशम टिपणीस हिची लेक तिच्यासारखीच सुंदर आणि ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबाबत खास गोष्टी

छोट्या पडद्यावर सध्या मराठी बिग बॉसची धूम पाहायला मिळतेय.बिग बॉसच्या घरातील ड्रामेबाजी, वाद आणि काही भावुक क्षण यामुळे मराठी बिग बॉसचा पहिला सीझन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. बिग बॉसच्या घरात सगळ्याच स्पर्धकांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. मात्र सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती रेशम टिपणीस हिची. घरातील स्पर्धक असलेला अभिनेता राजेश शृगांरपुरे याच्याशी रेशमचे बिग बॉसच्या घरात सूत जुळल्याचे पाहायला मिळत आहे. दोघंही बराच काळ एकत्र घालवताना पाहायला मिळत आहेत.शिवाय त्यांचे काही विशेष मोमेंट्सही बिग बॉसच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. रेशम टिपणीस खासगी आयुष्यात घटस्फोटित असून तिला एक मुलगी आणि मुलगा आहे. नुकतंच बिग बॉसच्या एका भागात रेशम आणि तिच्या लेकीचा फोनवरुन संवाद झाला. यावेळी लेकीचं बोलणं ऐकून रेशम भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.बिग बॉसच्या त्या भागातील त्या संभाषणामध्ये दोघींचं एकमेकींवर असलेले प्रेम पाहायला मिळालं. रेशमची लेकीसाठी आणि मुलासाठी असलेली काळजीही दिसून आली. रेशमच्या लेकीचे नाव रिशिका असे आहे. रिशिका सध्या 23 वर्षांची असून तिचं तिच्या आईशी म्हणजे रेशमशी विशेष नातं आहे. रेशमच्या लेकीचा आवाज तर साऱ्या जगाने ऐकला. त्यावरुन ती बरीच समंजस असल्याचे यावेळी दिसून आलं. मात्र प्रत्यक्ष जीवनात रिशिका कशी आहे हे तुम्हालाही जाणून घ्यायची इच्छा असेल. रेशमची लेक रिशिका ही आपल्या आईप्रमाणेच सुंदर आणि तितकीच ग्लॅमरस आहे.रिशिकाचा एक फोटो समोर आला असून त्यात तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो आहे.आईप्रमाणेच रिशिकाही मॉडर्न विचारांची आहे. रिशिका मनमौजी आणि जीवनाचा पूर्ण आनंद घेणारी असल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.सोशल नेटवर्किंग साईटवरही रिशिका अॅक्टिव्ह असते. रेशमचा पहिला पती संजीव सेठशी घटस्फोट झालाय. असं असलं तरी संजीव आणि त्याची दुसरी पत्नी लताशी रिशिकाचे चांगलेच संबंध आहेत.रिशिका आणि लताचे फोटोही सोशल नेटवर्किंग साईटवर पाहायला मिळतात.

SEE PICS:Bigg Boss Marathi :राजेश शृंगारपुरे अन् रेशम टिपणीसच्या परिवाराचे पाहा फोटो!
Web Title: Silk Tipnis, take her look as beautiful and glamorous as you know, special things about her
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.