राजेंद्रचा लाईफ मंत्रा आहे तरी काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 16:01 IST2016-09-10T10:30:09+5:302016-09-10T16:01:57+5:30

                क्राईम पेट्रोल या मालिकेतून आज घराघरात पोहचलेला अभिनेता राजेंद्र शिसतकरने जीवन ...

What is the life of Rajendra's life? | राजेंद्रचा लाईफ मंत्रा आहे तरी काय ?

राजेंद्रचा लाईफ मंत्रा आहे तरी काय ?

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> 
              क्राईम पेट्रोल या मालिकेतून आज घराघरात पोहचलेला अभिनेता राजेंद्र शिसतकरने जीवन जगण्याचा नवा फंडा शोधला आहे. आता तुम्ही म्हणाल की जीवन जगण्याचा फंडा म्हणजे नक्की काय. तर थोडे थांबा राजेंद्रने एक नवा मंत्र शोधून काढला आहे. प्रत्येकजणच आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात तणावाखाली जगत असतो. सतत टेन्शन्स आणि कामात माणूस नेहमीच व्यग्र असतो. अशा माणसांसाठी राजेंद्र सांगतोय लीव लाईफ...किंग साईज. हा एक नवीन आणि प्रेरणादायी फंडा त्याने सर्वांना सांगितला आहे. राजेंद्रचा हा मंत्रा आपल्याला त्याच्या आगामी मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस अनवॉन्टेड या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात राजेंद्र आपल्याला मिस्टर अनवॉन्टेड ही भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री स्मिता गोंदकरने त्यांच्या पत्नीची भूमिका निभावली आहे. एका वेगळ््या विषयावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा असल्याने तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असे त्यांचे मत आहे. दुहेरी कुटूंबाचे बिघडलेले गणितही आपण सोडवू शकतो असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. २३ सप्टेंबर रोजी हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: What is the life of Rajendra's life?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.