तेजश्री प्रधान सध्या काय करते?, एअरपोर्टवरील 'त्या' फोटोमुळे अभिनेत्री आली चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 13:58 IST2023-03-15T13:58:04+5:302023-03-15T13:58:24+5:30
Tejashree Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नुकताच इंस्टाग्रामवर एअरपोर्टवरील फोटो शेअर केला आहे. जो सध्या चर्चेत आला आहे.

तेजश्री प्रधान सध्या काय करते?, एअरपोर्टवरील 'त्या' फोटोमुळे अभिनेत्री आली चर्चेत
होणार सून मी या घरची या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) ओळखली जाते. चेहऱ्यावर सुंदर हास्य आणि सुंदर अभिनयामुळे तेजश्री कायमच चर्चेत असते. तिने ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत जान्हवी ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या या मालिकेतील भूमिकेचे आजही कौतुक केले जाते. बऱ्याच कालावधीपासून तेजश्री सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे. ती शेवटची अग्गंबाई सूनबाई मालिकेत झळकली होती. त्यामुळे तिच्या चाहत्यांना ती सध्या काय करतेय, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. दरम्यान तिचा सोशल मीडियावरील फोटो चर्चेत आला आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नुकताच इंस्टाग्रामवर एअरपोर्टवरील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती नो मेकअप लूकमध्ये दिसते आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, लंडनमध्ये भेटू. लंडन बोलवतंय. आनंदी आयुष्य. तेजश्री नेमकी लंडनमध्ये कशासाठी गेली, ते अद्याप समजू शकलेलं नाही. तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. तिच्या या पोस्टवर शिवानी बावकरने लिहिले की, लवकर ये. अभिनेता रोहन गुजरने लिहिले की, ऑल द बेस्ट ओयी. तिचे चाहते तिला लंडनमध्ये शूटिंगसाठी जाते आहे का, असे विचारत आहेत.
तेजश्री प्रधान मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिका आणि सिनेमाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अल्पावधीत तिने तिचा स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण केला आहे.