लंडनमध्ये काय करतेय तेजश्री प्रधान?, अभिनेत्रीचा 'तो' फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 17:41 IST2023-03-18T17:40:52+5:302023-03-18T17:41:15+5:30
Tejashree Pradhan : काही दिवसांपूर्वी तेजश्री प्रधानने इंस्टाग्रामवर एअरपोर्टवरील फोटो शेअर केला होता.

लंडनमध्ये काय करतेय तेजश्री प्रधान?, अभिनेत्रीचा 'तो' फोटो होतोय व्हायरल
होणार सून मी ह्या घरची मालिकेतील जान्हवीच्या भूमिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) घराघरात लोकप्रिय झाली. ही मालिका बंद होऊन बराच काळ उलटल्यानंतरही आजही ही भूमिका रसिकांच्या मनात घर करुन कायम आहे. याशिवाय तेजश्रीने मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. अग्गंबाई सूनबाई मालिकेत शेवटची ती झळकली. त्यानंतर ती बराच काळ सिनेइंडस्ट्रीतून गायब होते. त्यामुळे चाहते ती सध्या काय करतेय, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. अखेर आता याचा उलगडा झाला आहे. तेजश्री प्रधान सध्या लंडनमध्ये तिच्या आगामी सिनेमाचे शूटिंग करते आहे.
काही दिवसांपूर्वी तेजश्री प्रधानने इंस्टाग्रामवर एअरपोर्टवरील फोटो शेअर केला होता आणि लंडन कॉलिंग असे कॅप्शनमध्ये लिहिले होते. त्यामुळे ती लंडनला गेल्याचे समजले. त्यानंतर तिने आणखी एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती कॅमेऱ्यात दिसते आहे हात जोडताना. हा फोटो शेअर करत तिने गणपती बाप्पा मोरया असे लिहिले आहे. त्यामुळे तेजश्री सध्या लंडनमध्ये शूटिंग करत असल्याचे समजते आहे.
तेजश्री प्रधानसोबत या चित्रपटात अजिंक्य देव दिसणार आहे. अजिंक्य देवने फेसबुकवर सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की, माझा चित्रपट असा मी अशी मीच्या शूटिंगला बर्मिंगहममध्ये सुरुवात झाली आहे.
तेजश्री प्रधान मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिकांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकांसोबतच तेजश्री काही गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्येही झळकली आहे.