शितलने कोणती इच्छा व्यक्त केली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 12:15 IST2016-11-16T12:15:29+5:302016-11-16T12:15:29+5:30
सध्या मराठी चित्रपटांची चलती आहे. विदया बालननंतर प्रत्येक बॉलिवुड कलाकाराला मराठी चित्रपटात काम करण्याची उत्सकुता आहे. एवढेच नाही तर ...

शितलने कोणती इच्छा व्यक्त केली?
ध्या मराठी चित्रपटांची चलती आहे. विदया बालननंतर प्रत्येक बॉलिवुड कलाकाराला मराठी चित्रपटात काम करण्याची उत्सकुता आहे. एवढेच नाही तर मराठी चित्रपट करण्याची भुरळदेखील बॉलिवुड दिग्दर्शकांना झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच बॉलिवुडचा तगडा दिग्दर्शक करण जोहर याने सैराटचा हिंदी रिमेक बनविणार असल्याचे घोषित केले आहे. हे दृश्य पाहता छोटा पडदा असो या मोठा पडदा सर्वच कलाकार मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रेमात पडले आहे. तसेच हिंदी मालिकेतील कलाकारांनादेखील मराठी मालिकेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे दिसत आहे. आता हेच पाहा ना, बालिकावधू या मालिकेने प्रेक्षकांच्या मनापर राज्य केले आहे. याच मालिकेतील गेहनाचे पात्र हे अभिनेत्री शितल खांडल साकारत आहे. मात्र या अभिनेत्रीला सध्या मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे तिने पुणे येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. शितल म्हणाली, मी मुळची राजस्थानची आहे. पण बºयाच वषार्पासून मुंबईत वास्तवास आहे. त्यामुळे मराठी चित्रपट, नाटक आवर्जून पाहते. म्हणूनच मी मराठी चित्रपटाच्या भलतीच प्रेमात आहे. ती व्यवस्थित मराठी ही बोलते. चांगल्या संहितेच्या शोधात असलेली शितल सद्या मराठी भाषा शिकत आहे. तिचे भविष्यात एम. टी. व्ही वरती एका रियालिटी शोमध्ये मुख्य जजच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच बरोबर तिचा बॉलिवूडचा एका चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. म्हणून मला मराठीत काम करायला आवडेल असेदेखील शितल यावेळी म्हणाली. चला तर पाहूयात शितलची ही इच्छा कधी पूर्ण होते.