​ आर्या-अभिनय सध्या काय करतायत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 15:05 IST2016-12-09T14:59:41+5:302016-12-09T15:05:48+5:30

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा आता चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे याच्या बºयाच चर्चा रंगल्या होत्या. गायिका आर्या आंबेकर आणि अभिनय ...

What are you doing now? | ​ आर्या-अभिनय सध्या काय करतायत?

​ आर्या-अभिनय सध्या काय करतायत?

्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा आता चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे याच्या बºयाच चर्चा रंगल्या होत्या. गायिका आर्या आंबेकर आणि अभिनय बेर्डे हे दोघएही नवोदित कलाकार आपल्याला ती सध्या काय करतेय या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे दुसरे पोस्टर सोशल मिडियावर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये आपल्याला अभिनय आणि आर्या रोमँटिक मुडमध्ये दिसत आहेत. त्यामुळे या दोघांची सुंदर प्रेमकहाणी या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असेच दिसत आहे. हा चित्रपट सहा जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधानदेखील झळकणार आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांसाठी नवीन वर्षाचे खास गिफ्ट असणार आहे. हा चित्रपट सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केला आहे. सतीशचे चित्रपट हे नेहमीच वेगळ््या धाटणीचे असल्याचे आपण पाहतो. त्यामुळे सतीश या चित्रपटात काय खास घेऊन आला आहे हे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समजेलच. तेजश्रीने या आधी शर्यत, झेंडा, लग्न पाहावे करून असे अनेक चित्रपटदेखील केले आहेत. ती सध्या अभिनेता शर्मन जोशीसोबत मैं और तुम हे हिंदी नाटक करत आहे. चित्रपटाचे हे दुसरे पोस्टर प्रेक्षकांना तर नक्कीच आवडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आर्या-आणि अभिनयची ही हटके जोडी प्रदर्शना पूवीर्ची प्रेक्षकांची फेवरेट जोडी झाल्याचेच कळतेय. सध्या सोशल साईट्सवर या चित्रपटाच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता जाणवत आहे.

Web Title: What are you doing now?