​ काय आहे 4 जीबी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2016 16:19 IST2016-11-28T16:19:35+5:302016-11-28T16:19:35+5:30

मराठी चित्रपटांची नावे जर आपण पाहिलीत तर ती नक्कीच एकदम इंटरेस्टींग असतात. सध्या काळानूरुप मराठी चित्रपट बदलला आणि आता ...

What is 4 GB? | ​ काय आहे 4 जीबी ?

​ काय आहे 4 जीबी ?

ाठी चित्रपटांची नावे जर आपण पाहिलीत तर ती नक्कीच एकदम इंटरेस्टींग असतात. सध्या काळानूरुप मराठी चित्रपट बदलला आणि आता तशीच हटके नावे सुद्धा सिनेमाला येऊ लागली आहेत. नावात काय आहे असे जरी म्हंटले असले तरी सिनेमांच्या बाबतीत मात्र तसे नाही. कारण चित्रपटाच्या नावात बरेच काही दडलेले असते. तर एखादया चित्रपटाच्या नावावरुनच तो सिनेमा पाहायला जाण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली पाहायला मिळते. आता हेच पाहा ना नुकताच फोर जीबी नावाचा एक चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे नाव सगळ््यांशी एकदम रिलेट करणारे आहे. त्यामुळे या सिनेमात नक्की काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागल्याशिवाय राहणार नाही. चित्रपटाच्या पोस्टरवरच चार मुले दिसत आहेत. मग ही कहाणी या चार मुलांच्या भोवती फिरते का? या चौघांनाच फोर जीबी असे नाव आहे का. असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असणार. लवकरच या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे.  सचिन अंबात दिग्दर्शित 4 जीबी हा सिनेमा चार तरुण मुलांवर आधारीत असल्याचे या पोस्टर वरुन दिसत आहे. नुकतंच या सिनेमाचं टीझर पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. अ‍ॅडलीब्स प्रॉडक्शन्स प्रस्तुत 4 जीबी या सिनेमाचे दिग्दर्शन सचिन अंबात यांनी केले आहे तर मितेश चिंदरकर आणि प्रितीश कामत यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

Web Title: What is 4 GB?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.