'देवा' च्या घरात 'अफलातून' स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 13:51 IST2017-11-17T08:21:55+5:302017-11-17T13:51:55+5:30
इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित 'देवा' या १ डिसेंबरला प्रदर्शित होत असलेल्या सिनेमाच्या चर्चेला आता वेग आला आहे. या सिनेमाच्या प्रसिद्धीचे अनोखे ...
'देवा' च्या घरात 'अफलातून' स्वागत
दिग्दर्शक मुरली नलप्पा दिग्दर्शित 'देवा' या अतरंगी पात्राचे पोस्टर जितका कलरफुल आहे, तितकाच कलरफुल या सिनेमाचा ट्रेलर पाहायला मिळाला. अंकुशचा ‘देवा’ लूक आणि तेजस्विनीच्या‘माया’ या भूमिकेबरोबरच आणखी एक गोड धक्का मिळाला, तो म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशीदेखील या सिनेमामध्ये आहे. शिवाय दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचीदेखील झलक यात दिसत असल्यामुळे, त्यांच्या आठवणीलादेखील या कार्यक्रमात उजाळा मिळाला.
यानंतर अजून एक सुखद धक्का म्हणजे, ‘देवा’चे प्रमोशनल साँग! अजय गोगावले यांचा कमालीचा आवाज या गाण्याला लाभला असून, प्रथमच या सिनेमाच्या निमित्ताने वेगळ्या पठडीतले गाणे अजयने गायले आहे.
क्षितिज पटवर्धन लिखित या गाण्याचे अमितराज यांनी संगीतदिग्दर्शन केले असून, 'देवा' च्या व्यक्तिमत्वाला बोलके करणारे हे गाणे सिनेरसिकांना नक्कीच आवडेल. आयुष्याची विस्कटलेली घडी उलगडणारा हा 'देवा', प्रेक्षकांना पडलेले एक कोडे असून, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हे कोडे सुटणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही 'देवा' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा या ‘देवा’ च्या अतरंगी घरात ट्रेलर आणि म्युझिक लाँचबरोबर अनेक सुखद धक्क्यांनी पाहुण्यांची संध्याकाळ रंगतदार झाली.
देवा सिनेमाने प्रमोशसाठी एक भन्नाट कल्पना शोधुन काढली होती. ती म्हणजे महाराष्ट्राच्या २००हून अधिक ए.टी.एम.मध्ये या सिनेमाचा टीझर दाखविला जात आहे. हा टीझर २० सेकंदाचा असून, यामार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ‘देवा’ सिनेमाचा बोलबाला केला जात आहे.