सद्यस्थितीवर भाष्य करणारा 'वेदर रिपोर्ट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 12:06 IST2017-01-15T12:06:14+5:302017-01-15T12:06:14+5:30
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवची चर्चा सध्या रंगताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे या महोत्सवाचे १५ वे वर्ष आहे. ...

सद्यस्थितीवर भाष्य करणारा 'वेदर रिपोर्ट'
ुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवची चर्चा सध्या रंगताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे या महोत्सवाचे १५ वे वर्ष आहे. या महोत्सवात प्रेक्षकांना अनेक भाषेतील चित्रपटांची मेजवानी मिळत आहे. त्यामुळे हा महोत्सव प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. एक से एक मराठी चित्रपटानेदेखील प्रेक्षक आनंदी झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. असाच एक वेदर रिपोर्ट नावाचा मराठी चित्रपट या महोत्सवात सादर करण्यात आला आहे. रवी दावला दिग्दर्शित हा चित्रपट आहे.
या चित्रपटाविषयी रवी दावला सांगतात, '' हल्लीच्या बदलत्या जगात सुबत्ता आणण्याच्या नावाखाली आर्थिक संस्था या 'खलनायका'चे काम करू लागल्या आहेत. त्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न 'व्हेदर रिपोर्ट' हा चित्रपट आहे. हा चित्रपट मराठी असला तरी पुण्यासारखे शहर हे 'कॉस्मोपॉलिटिन' असल्याने त्यात मराठीबरोबरच इतर भाषांमधील संवाद अधिक आहेत. तसेच '' परस्परांची भेट झाली तर 'अभी क्या हाल है' हे विचारण्याची पद्धत असते आणि ती लक्षात घेऊनच चित्रपटाचे नाव 'व्हेदर रिपोर्ट' असे ठेवले आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटातील आयटी क्षेत्रातील तीन पात्रे इतकी 'कॉमन' आहेत की चित्रपटातील त्यांचा 'प्रवास' हा अनेकांचा असू शकतो आणि नव्या पिढीला तो चटकन समजणारा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पंधराव्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बिगर स्पर्धात्मक मराठी चित्रपटांमध्ये 'व्हेदर रिपोर्ट' दाखविण्यातआला आहे. त्यानिमित्त समर नखाते यांनी 'वेदर रिपोर्ट' च्या टीमशी खास संवाद साधला. याप्रसंगी या चित्रपटातील कलाकार अभिजित दास आणि छायालेखक अमूल्य चंद्रा हेही उपस्थित होते.