"आम्ही काही डेट वगैरे केलेली नाहीये..", लग्नाबद्दल हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:33 IST2025-09-16T13:32:08+5:302025-09-16T13:33:23+5:30
Hruta Durgule : अभिनेत्री हृता दुर्गुळेचा नुकताच 'आरपार' हा सिनेमा रिलीज झाला. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत आहे. यात त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

"आम्ही काही डेट वगैरे केलेली नाहीये..", लग्नाबद्दल हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली
हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने मालिकाविश्वातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने मालिका आणि चित्रपटात विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. नुकताच अभिनेत्रीचा आरपार हा सिनेमा रिलीज झाला. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत आहे. यात त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्रीने बऱ्याच ठिकाणी मुलाखती दिल्या. त्यातील एका मुलाखतीत तिने लग्नावर भाष्य केले आहे.
हृता दुर्गुळे हिने सुमन म्युझिक मराठीला दिलेल्या मुलाखतीत लग्नावर भाष्य केले. तिने सांगितलं की, ''करिअर ते मी करतेय. पैसे मी कमावते. घर मी केलंय. गाडी माझ्याकडे आहे. त्यामुळे तशी माझी फायन्शियल डिपेंडन्सी माझ्या पार्टनरवर कधीच नव्हती ना कधी ती असणार आहे. कारण मुळातच आम्हाला असं म्हणजे आई वडिलांनी वाढवलंय की तू बाबा पहिले आधी इंडिपेंडेंट हो. तुझे सगळे मटेरियलिस्टिक गोल्स येऊ दे मग तू ठरव असंच होतं ते कायम मग मला असं झालं की माझ्या बेसिक अपेक्षा आहेत.''
''लग्न खूप मोठी खूप जास्त मोठी जबाबदारी आहे...''
तिने पुढे म्हटलं की, ''एक लॉयल्टी आणि एक कम्युनिकेशन तर म्हटलं ते येत नसेल तर मला काही इंटरेस्ट नाहीये. लग्न करण्यात लग्नापेक्षा आय थिंक लग्न खूप मोठी खूप जास्त मोठी जबाबदारी आहे. कमिटमेंट करणारी कमिट होण्यात मला मग काहीच इंटरेस्ट नव्हता. व्हिच आय फील आणि खूप काळाने मी असा एक मुलगा बघितला हू इस रेडी टु टेक रिस्पॉन्सिबिलिटी हू इस रेडी टु स्टॅण्ड फॉर यू व्हिच आय थिंक इस व्हेरी रेयर आणि तो टिल डेट म्हणजे आता आम्हाला चार वर्ष होतील लग्नाला आणि आम्ही काही डेट वगैरे केलेली नाहीये. आम्ही भेटलो आम्ही विथिन सिक्स मंथ्स आमची एगेंजमेंट झाली. विथिन सिक्स मंथ्स आमचं लग्न झालं.''