"मराठी नाटकं अंथरूण पाहून पाय पसरतात, पण हिंदीमध्ये ", केतकी थत्ते नेमकं काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 13:12 IST2025-02-24T13:11:34+5:302025-02-24T13:12:10+5:30

Ketaki Thatte : अभिनेत्री केतकी थत्तेने अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'गलगले निघाले' या सुपरहिट सिनेमातून ती प्रसिद्धीझोतात आली.

"Watching Marathi plays makes you spread your legs, but in Hindi", what exactly did Ketaki Thatte say? | "मराठी नाटकं अंथरूण पाहून पाय पसरतात, पण हिंदीमध्ये ", केतकी थत्ते नेमकं काय म्हणाली?

"मराठी नाटकं अंथरूण पाहून पाय पसरतात, पण हिंदीमध्ये ", केतकी थत्ते नेमकं काय म्हणाली?

अभिनेत्री केतकी थत्ते (Ketaki Thatte)ने अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'गलगले निघाले' या सुपरहिट सिनेमातून ती प्रसिद्धीझोतात आली. नुकतेच केतकीने एका मुलाखतीत सिने करिअर आणि तिच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. यावेळी तिने हिंदी नाटकांच्या प्रयोगावेळी आलेल्या अनुभवाबद्दलही सांगितले. 

केतकी थत्ते म्हणाली की, हिंदीतल्या दौऱ्यांना खूप मजा असते. तुम्हाला वेगळीच ट्रीटमेंट असते. छान हॉटेल्स अशतात. कधीकधी फ्लाय करता किंवा टू टायर एसीने जाता. मी जी काही नाटक केली त्याच्यात आम्हाला रॉयल ट्रीटमेंट मिळाली होती.  मला एक प्रसंग आठवतो की कोलकात्ताला आमचा प्रयोग होता. टू टायर एसी ट्रेनची तिकिट काढली होती. जाताना कोलकत्ता येतंच नव्हतं. एक दिवस झाला आणि आमचं सगळ्यांचं असं झालं की कोलकात्ता येतंच नाहीये. कधी संपणार हा प्रवास असं झालं होतं. मग आमचे निर्माते-दिग्दर्शक सुनील शानबाग तिथे बसून म्हणाला की हे मी परत नाही करू शकत. ते काही करतात का बघू. नाहीतर आपण आपले पैसे टाकू. तुमच्याकडून कमी पैसे घेईन. पण आपण फ्लाइटने परत येऊ.

मराठी नाटकांचं...
ती पुढे म्हणाली की, ट्रेनमधून आम्ही तीन दिवसानंतरची फ्लाइट तिकिट बुक केली आणि परतताना फ्लाइटने आलो. आपल्याकडे (मराठी नाटकात) हे होऊ शकत नाही. आपली गणितच वेगळी आहेत. अंथरुण पाहून पाय पसरावेत हे आपल्याकडे पहिल्यापासून असल्यामुळे तिथे आपण हा कधी विचार केला नाही. 

Web Title: "Watching Marathi plays makes you spread your legs, but in Hindi", what exactly did Ketaki Thatte say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.