'दशावतार'मुळे बॉलिवूडलाही भरली धडकी! गेल्या १४ दिवसात सिनेमाची कमाई वाचून तुम्हाला वाटेल अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 09:41 IST2025-09-25T09:40:45+5:302025-09-25T09:41:35+5:30

'दशावतार' सिनेमाची बॉक्स ऑफिस कमाई बॉलिवूडला धडकी भरवणारी आहे. त्यामुळे मराठी सिनेमा इज बॅक असं म्हणता येईल

watch dashavtar marathi movie full box office collection day 14 dilip prabhavalkar | 'दशावतार'मुळे बॉलिवूडलाही भरली धडकी! गेल्या १४ दिवसात सिनेमाची कमाई वाचून तुम्हाला वाटेल अभिमान

'दशावतार'मुळे बॉलिवूडलाही भरली धडकी! गेल्या १४ दिवसात सिनेमाची कमाई वाचून तुम्हाला वाटेल अभिमान

दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या आणि सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलं आहे. कोकणातील गूढ कथेवर आधारित असलेला हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, या चित्रपटाने तिकीटबारीवर दमदार कमाई केली आहे. जाणून घ्या 'दशावतार'ची १४ दिवसांची कमाई किती झाली?

'दशावतार'ची कमाई किती?

'दशावतार' हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही आठवडे उलटले असले तरी त्याची बॉक्स ऑफिसवरील यशस्वी घोडदौड सुरूच आहे. Sacnilk च्या माहितीनुसार, या चित्रपटाचे एकूण कलेक्शन १७.५० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दुसऱ्या आठवड्यातही माऊथ पब्लिसिटिच्या जोरावर चित्रपटाने चांगली कमाई केली. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ९.२ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या वीकेंडला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे कमाईत मोठी वाढ झाली.

मराठीतील या वर्षातला मोठा हिट चित्रपट

'दशावतार'ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत अनेक जुने रेकॉर्ड मोडले आहेत. हा चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. कोकणची संस्कृती, चित्तथरारक कथा आणि दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्यासह इतर कलाकारांच्या सशक्त अभिनयामुळे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याचा अनुभव प्रेक्षकांना आवडला आहे. निर्मात्यांनी वेळोवेळी तिकीट दरांमध्ये सवलत देऊन प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, ज्याचा फायदाही चित्रपटाला झाला.

Web Title : 'दशावतार' की सफलता से बॉलीवुड हैरान; 14 दिनों में प्रभावशाली बॉक्स ऑफिस संग्रह।

Web Summary : दिलीप प्रभावळकर अभिनीत मराठी फिल्म 'दशावतार' बॉक्स ऑफिस पर हिट रही। कोंकण में स्थापित सस्पेंस थ्रिलर ने सकारात्मक चर्चा और दमदार प्रदर्शन से 14 दिनों में ₹17.50 करोड़ की कमाई की।

Web Title : 'Dashavatar' success stuns Bollywood; impressive box office collection in 14 days.

Web Summary : Marathi film 'Dashavatar,' starring Dilip Prabhavalkar, is a box office hit. The suspense thriller, set in Konkan, has grossed ₹17.50 crore in 14 days, driven by positive word-of-mouth and strong performances.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.