प्रतीक्षा लोणकर जिजाऊ ते ‘बारायण’ चित्रपटातील आधुनिक आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 11:19 IST2018-01-12T05:49:27+5:302018-01-12T11:19:27+5:30

शिवबाला संस्कारांचे वाण देणाऱ्या राजमाता जिजाऊ आपल्या सर्वाना परिचयाच्या आहेतच. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत जीजाऊची भूमिका तितक्याच ताकतीने ...

Waiting Lonkar Jijau is the modern mother of the film 'Barayana' | प्रतीक्षा लोणकर जिजाऊ ते ‘बारायण’ चित्रपटातील आधुनिक आई

प्रतीक्षा लोणकर जिजाऊ ते ‘बारायण’ चित्रपटातील आधुनिक आई

वबाला संस्कारांचे वाण देणाऱ्या राजमाता जिजाऊ आपल्या सर्वाना परिचयाच्या आहेतच. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत जीजाऊची भूमिका तितक्याच ताकतीने साकारणाऱ्या प्रतीक्षा लोणकर ‘बारायण’ या मराठी चित्रपटात आधुनिक आईच्या भूमिका साकारतायत. आपल्या मुलाला संस्कार देताना त्याच्या भविष्याचा विचार करणारी आई घरोघरी आपल्याला दिसते. या सिनेमात बारावी परीक्षेची तयारी करतांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी ‘अनिरुद्ध’ जेव्हा सज्ज होतो तेव्हा त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीशी उभी राहणारी त्याची आई असते. वेळच्या वेळी डबा बनवून देण, विषय आणि क्लास याप्रमाणे दप्तर तयार ठेवण, त्याला अभ्यासात त्रास होऊ नये म्हणून लहान बहिण चैतू आणि बाबांना टीव्ही न लावण्याबाबत सख्त ताकीद देण,अनिरुद्धला काय हवय तिला बरोबर समजत असत. त्याचे गोल चापात्यांचे हट्ट पुरवणं म्हणजे तीच आवडत काम. भविष्याला जिंकायला सज्ज झालेला तिचा अनिरुद्ध तिच्या रोज स्वप्नात येत असतो.‘बारायण’ या चित्रपटात अनिरुद्ध च्या आईचे काम करणाऱ्या प्रतीक्षा लोणकर यांची भूमिका काहीशी अशीच आहे.नात्यातील गोडवा जपत चुकल्या क्षणी शब्दांच्या चाबुकाचे फटकारे ओढणारी एक टिपिकल आई ‘बारायण’ मधून आपल्याला पाहायला मिळते.तुमच्या घरातील सगळ्यांसोबत बारायण सिनेमाचा आनंद जवळच्या चित्रपट गृहात नक्की घ्या. आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेच्या वेळी तुमच्यासोबत रात्र रात्र भर जागलेल्या आईसाठी आणि तिच्यासाठी प्रयत्न करणारी तिची मुलं यांनी आवर्जून पाहावा असा सिनेमा आहे. 

​ Also Read:पालक आणि पाल्यामधील संवादाचे महत्त्व अधोरेखित करणारा ‘बारायण’

चित्रपटात वडिलांचीे भूमिका साकरणाऱ्या नंदू माधव यांनी सांगितले की, पेशाने शिक्षक असणाऱ्या पण बारावीत असणाऱ्या मुलाच्या बापाच्या वेगळ्याच इच्छा असणारा, त्याच्या भवितव्याविषयी बायकोपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करणाऱ्या व्यक्तीची भूमिका मी साकारतो आहे. मुलाचे बारावीचे वर्ष म्हणजे घरात, शेजारी, नातेवाईकांमध्ये, गल्लीत सगळीकडेच किती गांभीर्याची स्थिती निर्माण झाली आहे, अचानक सगळेच कसे काळजीवाहू झाले आहेत, या दरम्यान होणाऱ्या गमतीजमतीची कहाणी म्हणजे हा चित्रपट आहे. मी आजवर केलेल्या चित्रपटांपैकी हा सर्वात सुंदर आणि वरच्या पायरीवरचा चित्रपट असेल असा विश्वास वाटतो असेही नंदू माधव यांनी यावेळी सांगितले. चित्रपटात आईची भूमिका साकारणाऱ्या प्रतिक्षा लोणकर यांनी सांगितले की,बारावीची परीक्षा देणाऱ्या,कोणत्याही परिस्थितीत त्याने उत्तम गुण मिळवून मेडिकलला गेले पाहिजे, डॉक्टर झाले पाहिजे या इच्छेसाठी जीवाचे रान करणारी,झापड लावलेली आई मी यात रंगवली आहे. या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर मला ती खुप आवडली. प्रत्यक्षात शुटिंग सुरू झाल्यानंतर तर चित्रपट कमी वाक्यांमधुन आणि दृष्यांमधुन खुप मोठा संदेश देणारा, हसतखेळत प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा सिनेमा आहे याची मला खात्री पटली. सावंतवाडी, बारामती अशा छोट्या शहरांमध्ये या चित्रपटाचे शुटिंग झाले असून छोट्या शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील,समाजातील चित्र या सिनेमात रेखाटण्यात आले असल्याचे दिग्दर्शक पाटील यांनी सांगितले.

Web Title: Waiting Lonkar Jijau is the modern mother of the film 'Barayana'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.