सोशलमीडियावर 'आयुष्य' नावाचा लघुपट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 12:45 IST2017-02-21T07:15:00+5:302017-02-21T12:45:00+5:30

आयुष्य नावाचा लघुपट सोशलमीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.

Viral is a short film called 'Life' on social media | सोशलमीडियावर 'आयुष्य' नावाचा लघुपट व्हायरल

सोशलमीडियावर 'आयुष्य' नावाचा लघुपट व्हायरल

्या लघुपटाची क्रेझ मराठी इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक लघुपट येत असल्याचे दिसत आहेत. एवढेच नाही तर या लघुपटांमध्ये मराठी कलाकारांचे चेहरेदेखील झळकत आहे. त्याचबरोबर काही मराठी कलाकार तर  चक्क लघुपट दिग्दर्शित करण्याच्या प्रेमातच पडले आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री स्मिता तांबे हिने लघुपट दिग्दर्शित केली असल्याची चर्चा रंगत होती. तसेच अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने स्वत: लघुपटाचे लिखाण केले आहे. त्यामुळे ही अभिनेत्रीदेखील लघुपटाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अशा पध्दतीने लघुपटाच्या प्रेमात असलेल्यांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. 
       
       आता, असाच एक लघुपट सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. आयुष्य असे या लघुपटाचे नाव आहे. १२ मिनीटांचा हा लघुपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. कारण या लघुपटाच्या माध्यमातून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा लघुपट ग्रामीण
महाराष्ट्रात चित्रित करण्यात आला आहे. ग्रामीण जीवनात काय अडचणी येतात, यावर भाष्य करणारा हा लघुपट आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या या लघुपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. थोडक्यात, शेतकºयाचे आयुष्य हे अगदी कमी वेळेत नवोदित कलाकारांनी प्रेक्षकांसमोर उत्तमरीत्या मांडले आहे. त्यामुळे सोशलमीडियावर या लघुपटाचे कौतुकदेखील प्रचंड प्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हर्षल गवळी दिग्दर्शित हा लघुपट आहे. तर या लघुपटाची निर्मिती सागर भूमकर याने केली आहे. विशेष म्हणजे हा लघुपट अभिनेता अंकुश चौधरीच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला होता. 


Web Title: Viral is a short film called 'Life' on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.