विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळ्ये झळकणार चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 15:52 IST2017-04-29T10:22:51+5:302017-04-29T15:52:51+5:30
मराठी चित्रपटसृष्टीत आता विविध प्रयोग होताना दिसत आहे. नवीन विषय आणि साचेबद्ध मांडणीमुळे आज मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारत आहे. ...

विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळ्ये झळकणार चित्रपटात
म ाठी चित्रपटसृष्टीत आता विविध प्रयोग होताना दिसत आहे. नवीन विषय आणि साचेबद्ध मांडणीमुळे आज मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारत आहे. त्यामुळेच अनेक निर्माते आणि प्रस्तुतकर्त्यांची रेलचेल मराठीत वाढताना दिसून येत आहे. येत्या २ जून रोजी प्रदर्शित होत असलेल्या 'बेहेन होगी तेरी' आणि 'डाव' या मराठी-हिंदी द्विभाषिक चित्रपटांचे प्रस्तुतकर्ते 'ऑडबॉल मोशन पिक्चर' हे त्यातलेच एक उदाहरण. 'देव देव्हाऱ्यात नाही' या आगामी मराठी सिनेमाचे देखील ते प्रस्तुतकर्ते असून, या चित्रपटाद्वारे ते एक नवीन विषय घेऊन येत आहे.
देव देव्हाऱ्यात नाही या सिनेमाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळ्ये या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दोघांनी नेहमीच मालिका आणि चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. ते दोघे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. प्रवीण बिर्जे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित आहे. याची कथा, पटकथा तसेच संवाद आशिष देव यांनी लिहिली आहे. नितीन उपाध्याय यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळये या दिग्गज जोडीबरोबरच यात अभिनेत्री रीना अगरवालदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अस्सल कौटुंबिक मेलोड्रामा असणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या मे महिन्यापासून सुरुवात होत आहे. 'देव देव्हाऱ्यात नाही' या सिनेमाच्या शीर्षकावरून या चित्रपटाविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
![Vikram Gokhale]()