विदया बालनचा एक अलबेला जूनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 13:12 IST2016-04-29T07:42:16+5:302016-04-29T13:12:16+5:30

बॉलिवूडची तगडी अभिनेत्री विद्या बालन ही एक अलबेला च्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

Vidya Balan's one in June | विदया बालनचा एक अलबेला जूनमध्ये

विदया बालनचा एक अलबेला जूनमध्ये

वान आबाजी पालव म्हणजेच आपले भगवान दादा यांचा जीवनपट वर असलेल्या या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे. कारण हा एक या चित्रपटामध्ये बॉलीवुडची तगडी अभिनेत्री विदया बालन या एक अलबेलाच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीट पदापर्ण करीत आहे. तसेच शोला जो भडके दिल मेरा धडके...दर्द जवानी का सताये भरभरके... म्हणत सगळ्यांनाच साध्या सरळ नृत्याकडे आकर्षित करणाºया भगवान दादांच्या जीवनावर असलेला हा गेले कित्येक दिवस विविध कारणांनी चर्चेत आहे. भगवान दादांची भूमिका मंगेश देसाई साकारत आहे. त्यांनी आत्मसात केलेला भगवान दादांचा लूक, अभिनय आणि त्यांची नृत्यशैली याची चर्चा चित्रपटसृष्टीत सुरू आहे. हा चित्रपट शेखर सरतांडेल यांनी दिग्दर्शित केला असून १० जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


Web Title: Vidya Balan's one in June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.