या व्हिडीओने प्रेक्षकांना याड लावलयं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 12:47 IST2017-02-11T07:17:21+5:302017-02-11T12:47:21+5:30

सैराट या चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडीओ प्रचंड गाजत आहे

This video unleashes the audience ... | या व्हिडीओने प्रेक्षकांना याड लावलयं...

या व्हिडीओने प्रेक्षकांना याड लावलयं...

 
ैराट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नऊ महिने झाले असले तरी या चित्रपटाची चर्चा अजूनदेखील आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटातील गाण्यांनी तर जगभरात सगळयांना सैराट बनवून सोडले आहे. आता हेच पाहा ना, या चित्रपटातील गाणी पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आले आहे. सध्या या चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडीओ प्रचंड गाजत आहे. झाले असे की, दिल है हिंदुस्तानी या रिअलिटी शोमध्ये एका दाक्षिणात्य ग्रुप युफोनी बँडने याड लागलं हे गाणं सादर केले. त्यांचे हे गाणे ऐकून प्रेक्षक ही अवाक झाले आहे. पाहता पाहता, त्यांचे हे गाणे सोशलमीडियावर हिट झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. या ग्रुफ सर्व प्रेक्षकांनाच याड लावून ठेवलं आहे. दिवसेंदिवस हा व्हिडीओ पाहणाºयाची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोशलमीडियावर सैराटमय वातावरण निर्माण झाले आहे.
     
       हे चित्रपट पाहता, नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा चित्रपट यशाची पायरी एक से एक चढत असल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर या चित्रपटाचा दाक्षिणात्य रिमेकदेखील लवकरच पाहायला मिळणार आहे. या ही पलीकडे जाऊन या चित्रपटात प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटाचा बॉलिवुड रिमेकदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. कळते असे की, हा चित्रपट नागराज मंजुळेच दिग्दर्शित करणार आहे. त्यामुळे सैराट चित्रपटाप्रमाणेच कलाकारदेखील सुपर डूपर हीट झाले असल्याचे दिसत आहे. 


        

Web Title: This video unleashes the audience ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.