VIDEO : प्रिया बापटने सांगितले सुखी संसाराचे सीक्रेट, व्हिडीओ आला चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 15:04 IST2022-10-15T15:03:10+5:302022-10-15T15:04:05+5:30
Priya Bapat And Umesh Kamat: मराठी सिनेइंडस्ट्रीतील उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी लोकप्रिय कपलपैकी एक आहे.

VIDEO : प्रिया बापटने सांगितले सुखी संसाराचे सीक्रेट, व्हिडीओ आला चर्चेत
मराठी सिनेइंडस्ट्रीतील उमेश कामत (Umesh Kamat) आणि प्रिया बापट (Priya Bapat) ही जोडी लोकप्रिय कपलपैकी एक आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. या दोघांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असून ते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. दरम्यान आता प्रिया बापटने नुकताच एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या पोस्टमधून प्रियानं यशस्वी वैवाहिक जीवनाचं सीक्रेट सांगितले आहे.
प्रिया बापट हिने इंस्टाग्रामवर उमेश कामतसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात आवाज ऐकू येत आहे की तुमच्या दोघांमध्ये सर्वात आधी सॉरी कोण बोलते त्यावर प्रिया उमेशकडे हात दाखवत म्हणते की जो चुकीचा असतो तो आणि हसू लागतो. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, सुखी संसारामागचे सीक्रेट, सॉरी बोला. प्रिया आणि उमेशच्या या मजेशीर व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
प्रिया बापट आणि उमेश कामतने सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नबेडीत अडकले. ते दोघे एकाच इंडस्ट्रीत असल्याने खूप अगोदरपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेतला आणि प्रेम व्यक्त केले. उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला होकार दिला.