अभिनेता सुबोध भावेचा घोडेस्वारी करतानाचा व्हिडीओ आला समोर, कॅप्शनमध्ये म्हटलं - 'तयारी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 12:21 IST2021-01-14T12:20:05+5:302021-01-14T12:21:09+5:30
सुबोध भावेने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो घोडेस्वारी करताना दिसतो आहे.

अभिनेता सुबोध भावेचा घोडेस्वारी करतानाचा व्हिडीओ आला समोर, कॅप्शनमध्ये म्हटलं - 'तयारी'
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तसेच तो सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. याशिवाय आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असतो. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.
सुबोध भावेने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो घोडेस्वारी करताना दिसतो आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये तयारी असे लिहिले आहे.
एरव्ही दमदार अभिनयाबरोबर वेगवेगळ्या भूमिकांचा माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा सुबोध आता काय नवीन घेऊन येतोय, हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत.
सुबोधने आज मराठी चित्रपटसृष्टीत त्याची एक खास जागा निर्माण केली आहे. तो एक खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक देखील आहे. त्याने मराठीसोबत हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सुबोध भावे आपल्या ‘कान्हाज मॅजिक’ या निर्मिती संस्थेद्वारे ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेची निर्मिती केली आहे.
या व्यतिरिक्त सध्या तो कलर्स मराठी वाहिनीवरील चंद्र आहे साक्षीला या मालिकेत मुख्य भूमिकेत पहायला मिळतो आहे. या मालिकेत नुकतेच श्रीधर आणि स्वातीचे लग्न पार पडते. त्यानंतर आता मालिकेत कोणते नवीन वळण येणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.