रितेश देशमुखला छत्रपती शिवरायांच्या रुपात पाहून भारावला 'छावा' फेम विकी कौशल, 'राजा शिवाजी'च्या पोस्टरवर कमेंट करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 18:38 IST2026-02-20T18:38:23+5:302026-02-20T18:38:51+5:30
'छावा' फेम विकी कौशलने रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाच्या पोस्टरवर कमेंट केली आहे.

रितेश देशमुखला छत्रपती शिवरायांच्या रुपात पाहून भारावला 'छावा' फेम विकी कौशल, 'राजा शिवाजी'च्या पोस्टरवर कमेंट करत म्हणाला...
शिवजयंतीच्या मुहुर्तावर रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. यात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत रितेश देशमुखचा जबरदस्त लूक दिसला. हातात भगवा ध्वज घेऊन रितेश देशमुख छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत पाहायला मिळाला. हातात तलवार आणि कपाळावर टिळा असलेले छत्रपती शिवाजी महाराज या पोस्टरवर दिसत आहेत. रितेश देशमुखला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये पाहून चाहते थक्क झाले. तर बॉलिवूड अभिनेता विकी कौशलही भारावून गेला आहे.
'छावा' फेम विकी कौशलने रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाच्या पोस्टरवर कमेंट केली आहे. छावामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून विकी कौशल आश्चर्यचकित झाला आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर त्याने "आबासाहेब..." अशी कमेंट केली आहे. विकी कौशलच्या या कमेंटची प्रचंड चर्चा रंगली आहे. विकी कौशलने अशी कमेंट करत रितेशला मानाचा मुजरा दिला आहे. ही कमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून 'शंभूराजेंनी शिवरायांना दिलेली ही साद' असल्याचे म्हटले जात आहे.

केवळ विकीच नाही, तर चित्रपटसृष्टीतील सायली संजीव, मिलाप झवेरी, रमेश तौरानी, विवेक ओबेरॉय, अनुपम खेर, अमृता खानविलकर, मनीष पॉल, राहुल देव, लिझेल रेमो डिसूझा आणि मुश्ताक शेख यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आणि निर्मात्यांनी देखील पोस्टर शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे २०२६ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मराठीसह हिंदी कलाकारांची फौज आहे. सिनेमात रितेश देशमुख छत्रपती शिवरायांची प्रमुख भूमिका साकारत आहे. सिनेमात रितेशसह जिनिलीया देशमुख, जितेंद्र जोशी, सलमान खान, भाग्यश्री, संजय दत्त, फरदीन खान हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.