व्हेंटिलेटरचे जय देवा गाणे प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 16:32 IST2016-09-14T11:02:22+5:302016-09-14T16:32:22+5:30
बॉलिवूड टू हॉलिवूड सफर करणाºया प्रियांकाचा व्हेंटिलेटर हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून फरारी की ...
व्हेंटिलेटरचे जय देवा गाणे प्रदर्शित
ॉलिवूड टू हॉलिवूड सफर करणाºया प्रियांकाचा व्हेंटिलेटर हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून फरारी की सवारी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणाºया राजेश मापुसकरांचेही हे मराठीत पदार्पण होत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील दोन गणपतीच्या गाण्यांचा आॅडियो लाँच करण्यात आला होता. आता या चित्रपटातील 'जय देवा' या गाण्याचा व्हिडियो अभिनेते अनिल कपूर यांच्या हस्ते लाँच करण्यात आले आहे. यावेळी चित्रपटाचे संगीतकार रोहन यांच्याबरोबरीने गणेश चंदनशिवे यांनी हे गाणे प्रेक्षकांसमोर सादर केले. अंधेरीच्या राजावर देसी गर्ल प्रियांकाची अढळ श्रद्धा आहे. याच श्रध्देपायी आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं पहिलं गाणं हे अंधेरीच्या राजासमोर ढोल ताशांच्या गजरात तिने अर्पण केले आहे. यावेळी या चित्रपटातले कलाकार जितेंद्र जोशी उपस्थित होते.