वीणा जामकर आहे उषा नाईक यांची फॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 16:17 IST2017-03-02T10:47:24+5:302017-03-02T16:17:24+5:30
आपल्याला आवडणारा कलाकार एकदा तरी आपल्याला भेटावा, आपल्याशी त्याने गप्पा माराव्यात असे अनेकांना वाटत असते. आपल्या आवडत्या कलाकाराला भेटून ...
.jpg)
वीणा जामकर आहे उषा नाईक यांची फॅन
आ ल्याला आवडणारा कलाकार एकदा तरी आपल्याला भेटावा, आपल्याशी त्याने गप्पा माराव्यात असे अनेकांना वाटत असते. आपल्या आवडत्या कलाकाराला भेटून ते नेहमीच खूश होतात. पण एखादा कलाकारही दुसऱ्या कलाकाराचा फॅन असतो आणि त्याला भेटल्यानंतर झालेला आनंद त्याच्यासाठी खूप जास्त असतो.
वीणा जामकर ही उषा नाईक यांची मोठी फॅन आहे. काही दिवसांपूर्वी वीणा एका स्टुडिओत चित्रीकरण करत असताना उषा नाईक तिच्या समोर आल्या. त्यावेळी ती एक अभिनेत्री आहे हे विसरून ती केवळ उषा नाईक यांची फॅन बनली होती. एक हजाराची नोट या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची ती खूप मोठी फॅन आहे. या चित्रपटातील त्यांचा अभिनय पाहून वीणा चाट पडली होती. उषा नाईक यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक चित्रपटात लावणी सादर केली होती तर अनेक चित्रपटात रोमँटिक सीन सादर केले होते. त्यातील त्यांचा गोड चेहरा इतके विलक्षण भावही चेहऱ्यावर आणू शकतो हे एक हजाराची नोट या चित्रपटात अनुभवून ती स्तिमीत झाली होती. त्यांच्या इतरही सिनेमांमध्ये त्यांनी उत्तम कामे केले असली तरी एक हजाराची नोट या चित्रपटातील त्यांचे काम वीणाला फार आवडते. त्यांना त्यांच्या उतारवायत इतकी चांगली भूमिका साकारायला मिळाली याचे वीणाला अप्रूप वाटते. त्यांना एक हजाराची नोट या चित्रपटातून मिळालेली संधी त्यांनी ओळखली आणि त्याचे सोने केले.
उषा नाईक यांना ती भेटली याची तुलना तिने प्रियांका चोप्रा मेरील स्ट्रीपला भेटली याच्यासोबत केली आहे. ती सांगते, "प्रियांकाला मेरी स्ट्रिपला भेटून जितका आनंद झाला तितकाच आनंद मला आज उषा ताईंना भेटून झाला आहे."
![priyanka chopra meryl streep]()