Pathaan vs Ved : 'पठाण'ची हवा, पण रितेश भाऊचं 'वेड' संपेना.., चौथ्या आठवड्यात धमाकेदार कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 11:57 IST2023-01-29T11:56:55+5:302023-01-29T11:57:29+5:30

Ved Box Office Collection: 'पठाण' समोर रितेश भाऊच्या 'वेड'चा निभाव लागणं कठीण आहे, असा सगळ्यांचा अंदाज होता. पण 'वेड' अद्यापही थिएटरमध्ये सुरू आहे...

Ved Box Office Hang In There In Fifth Week, Despite Pathaan Mania | Pathaan vs Ved : 'पठाण'ची हवा, पण रितेश भाऊचं 'वेड' संपेना.., चौथ्या आठवड्यात धमाकेदार कमाई

Pathaan vs Ved : 'पठाण'ची हवा, पण रितेश भाऊचं 'वेड' संपेना.., चौथ्या आठवड्यात धमाकेदार कमाई

Ved Box Office Collection : बॉलिवूडचा किंग अर्थातच अभिनेता शाहरुख खानचा 'पठाण' (Pathaan ) सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्याआधी रितेश देशमुख (Riteish Deshmukh ) आणि जिनिलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) 'वेड' या मराठी चित्रपटाने धमाका केला होता. पण 'पठाण'च्या त्सुनामीसमोर 'वेड'चा टिकाव लागणार नाही, असाच सर्वांचा अंदाज होता. मात्र ' 'वेड' अद्यापही टिकून आहे. होय, रितेश व जिनिलियाचा सिनेमा चौथ्या आठवड्यातही प्रेक्षक खेचतोय.

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या 'वेड' या मराठी सिनेमाने रिलीजपासूनच हवा केली आहे. ३० डिसेंबरला 'वेड' रिलीज झाला. आता चौथा आठवडा सुरू आहे आणि 'वेड' चित्रपटगृहांत सुरू आहे. 'पठाण'ची जबरदस्त हवा असताना 'वेड' स्थिर उभा आहे. शाहरुखच्या चित्रपटाचा 'वेड'वर फारसा परिणाम झालेला नाहीये, असं आकडे पाहून तरी वाटतंय.

'वेड'ने पहिल्या वीकेंडमध्ये २०.६७ कोटी कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात 'वेड'च्या कमाईचा आकडा ४०.८५ कोटींवर पोहोचला. तिसऱ्या आठवड्यात 'वेड'च्या कमाईत काहीशी घट दिसली. पण तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केला. चौथ्या आठवड्याच्या मध्यात 'पठाण' रिलीज झाला. 'पठाण'ला 'वेड' काय फाईट देणार?, असा सर्वांचा समज होता. पण, 'वेड'ने हा अंदाज फोल ठरवला आहे. 'वेड' चित्रपटाने चौथ्या आठवड्यात 6.11 कोटींची कमाई केली आहे.  एकूण कमाईचं म्हणाल तर 'वेड'ने आत्तापर्यंत तब्बल 57.15 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

'वेड' हा रितेश देशमुखचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा आहे. अभिनेत्याने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे.  तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून जिनिलिया देशमुखने मराठीत पदार्पण केलं आहे. ‘वेड’ या चित्रपटात जिनिलिया आणि रितेश सोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Web Title: Ved Box Office Hang In There In Fifth Week, Despite Pathaan Mania