वर्षा उसगांवकर अभिनित ‘जांवय नं. १’ चित्रपटाची यशस्वी घौडदौड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 14:30 IST2018-05-08T09:00:27+5:302018-05-08T14:30:27+5:30

आपल्या अभिनयाने मराठीच नाही तर इतर भाषिक सिनेरसिकांच्या मनावर गारुड करणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या ‘जांवय नं. १’  ...

Varsha Usgaonkar starrer 'Jawaay Naa' 1 '' Successful action of the film | वर्षा उसगांवकर अभिनित ‘जांवय नं. १’ चित्रपटाची यशस्वी घौडदौड

वर्षा उसगांवकर अभिनित ‘जांवय नं. १’ चित्रपटाची यशस्वी घौडदौड

ल्या अभिनयाने मराठीच नाही तर इतर भाषिक सिनेरसिकांच्या मनावर गारुड करणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या ‘जांवय नं. १’  या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून बच्चे कंपनीसोबत सह कुटुंब या चित्रपटाचा आस्वाद घेता येतोय.सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला मुबंई, मँगलोर, उडपी, कारवार तसंच कर्नाटक शहरामध्ये दमदार ओपनिंग मिळाले असून सलग चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांचा ओघ सुरूच आहे.

‘जांवय नं. १’ चित्रपटाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे यातील महत्त्वपूर्ण मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा अप्रतिम अभिनय. या सिनेमाद्वारे त्या प्रथमच कोकणी सिनेमात काम करीत आहेत. कोकणी चित्रपटात दमदार पदार्पण करीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने वठविली सासूची भूमिका व हा चित्रपट कोकणी प्रेक्षकांसह मराठी प्रेक्षकांच्याही पसंतीला उतरेल असा विश्वास वर्षाजी व्यक्त करतात.

हॅरी फर्नांडीस यांची साधी सोपी मनोरंजनपर कथा आणि दिग्दर्शन, वर्षा उसगांवकर, जोशिता रोड्रीक्स, रंजीथा ल्युईस दिपक पलाडका, प्रिन्स जेकब, केविन डिमेलो या कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयाने सजलेला ‘जांवय नं. १’ चित्रपट सध्या प्रेक्षकांची मने जिंकतो आहे. ‘सांगाती क्रिएशन’ची प्रस्तुती असलेल्या ‘जांवय नं. १’  या चित्रपटाने पहिल्या तीन आठवड्याची सुरूवात दणक्यात केली आहे. रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी अनेक चित्रपटगृहांतील या चित्रपटाचे खेळ हाउसफुल्ल’ झाले होते. सर्वत्र दमदार ओपनिंग मिळालेल्या या चित्रपटाचे मुंबईच्या बहुतांशी मल्टीप्लेक्स व सिंगल थिएटर चित्रपटगृहातील खेळ वाढविण्यात आले आहेत.

साधी सोपी मनोरंजनपर कथा, श्रवणीय संगीत आणि सर्वच कलाकारांचा दमदार अभिनय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत. पैसा वसूल धमाल कॉमेडी असणारा ‘जांवय नं. १’  येत्या ११ मे रोजी  गोव्यात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी बुधवार ९ मे ला या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर व संगीत प्रकाशन सोहळा सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. तसेच एन्टरटेंन्मेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) च्या वतीने या चित्रपटाचे खास शो गोव्याच्या विविध भागात आयोजित करण्यात येणार आहेत. या चित्रपटातील गाणी कोंकणी आणि मँगलोर,  संगीत रसिकांच्या मनावर मोहिनी घालण्यात आधीच यशस्वी ठरली आहेत.

सिरील कॅस्टेलिनो, लिओ फर्नांडीस, वॅाल्टर डिसोझा निर्मित ‘जांवय नं. १’ या चित्रपटात सासू आणि जावई यांची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच कथा-पटकथा-संवादलेखनही हॅरी फर्नांडीस यांनी केलं आहे.शौफिक शेख यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असून अभिषेक म्हसकर यांनी संकलन केलं आहे.

Web Title: Varsha Usgaonkar starrer 'Jawaay Naa' 1 '' Successful action of the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.