Valentine day Special: प्राजक्ता माळी -भूषण प्रधान करून देणार पहिल्या भेटीची आठवण !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 14:04 IST2017-02-13T08:34:55+5:302017-02-13T14:04:55+5:30
१२ दर्जेदार कलावंतांची म्युजीकल 'फिलिंग' देणाऱ्या या गाण्यांवर चित्रित करण्यात आले आहे. १२ दिग्गज गायक आणि चित्रपट कलावंताची आवाजातली गाणी ऐकायला मिळणार आहेत.

Valentine day Special: प्राजक्ता माळी -भूषण प्रधान करून देणार पहिल्या भेटीची आठवण !
प रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं... प्रेमाची हि लव्हस्टोरी प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या भेटीपासून सुरु होते. एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी ती पहिली भेट गरजेची असते. 'व्हेलेंटाईन डे' च्या निमित्ताने प्रेमीयुगुलांना त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारे एक रॉमेंटिक सॉंग यु-ट्यूब वर व्हायरल होत आहे. प्राजक्ता माळी आणि भूषण प्रधान या जोडीवर आधारित असलेले हे गाणे आपल्या व्हेलेंटाईन डेटला अजून खास ठरत आहे. 'फिलिंग्स' या म्युजीकल अल्बममधले हे गाणे स्वप्नील बांदोडकर याने गायले असून, या गाण्यांचे किरण खोत यांनी दिग्दर्शन केले आहे. प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारा प्राजक्ता -भूषण वर आधारित हे गाणे प्रत्येकाला नॉस्टेलजीक कारणारे ठरत आहे. विशेष म्हणजे, श्रेया घोषाल, स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, आदर्श शिंदे अशा नामांकित गायकांचा आवाज या म्युजिक अल्बमला लाभला असून मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते महेश मांजरेकर,सचिन खेडेकर,जितेंद्र जोशी, अवधूत गुप्ते, संतोष जुवेकर प्रिया बापट, स्पृहा जोशी, आणि सोनाली कुलकर्णी या कलाकारांच्या आवाजाची जादूदेखील आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. नुकतेच या म्युजिक अल्बमचे सचिन पिळगावकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. १२ दर्जेदार कलावंतांची म्युजीकल 'फिलिंग' देणाऱ्या या गाण्यांवर चित्रित करण्यात आले आहे. १२ दिग्गज गायक आणि चित्रपट कलावंताची आवाजातली गाणी ऐकायला मिळणार आहे.या अल्बममध्ये प्रणय,विरह,श्रुंगार,प्रेम,प्रोत्साहन आणि पाऊस या थीम्सवर आधारित गाणी असणार आहेत. तरुणाईला संगीताची नवी 'फिलिंग' देणारा हा मुजिक अल्बम रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.