आपल्या जादुई आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाºया वैशाली माडे या गायिकने नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
वैशालीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
/> आपल्या जादुई आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाºया वैशाली माडे या गायिकने नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. वैशालीने अतिशय स्ट्रगल करुन या सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केली व अस्तिव तयार केले आहे. मराठी सिनेमा व मालिकांमध्ये पार्श्वगायन केल्यानंतर तिला थेट संजय लीला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातील पिंगा हे गाणे गायची संधी मिळाली. या गाण्यानंतर वैशालीची गाडी सुसाट सुटली आहे अन ती नुकतीच मुख्यमंत्र्यांना देखील भेटून आलीये. आता वैशाली मुख्यमंत्र्यांना का भेटली असा प्रश्न तर तिच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. तर याबाबत खुदद वैशालीने सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, पिंगा गाण्यानंतर आम्हाला भेटयचेच होते. पण काही केल्या आमच्या वेळा जुळून येत नव्हत्या. मग फआयनली आमची भेट झाली. मुख्यमंत्र्यांसोबत अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. मी अमरावतीची असल्याने मला माझ्या माहेरीच आल्या सारखे वाटले. आता वैशालीने तिच्या या भेटीत कोणत्या विषयावर नक्कीच चर्चा के ली हा गोष्ट तर गुलदस्त्यातच आहे. परंतू तिने चांगल्या चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करुन अशा प्रकारच्या संधी आयुष्यात कमवाव्यात असेच तिच्या चाहत्यांना वाटत असणार.
Web Title: Vaishali took the chief minister's visit