रणवीर सिंगच्या सिनेमातील बहिणीने शेअर केला हा नवा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 14:03 IST2019-12-04T13:50:43+5:302019-12-04T14:03:33+5:30

वैदेही परशुरामी बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती.

Vaidehi parshurami looks gorgeous in her new photo | रणवीर सिंगच्या सिनेमातील बहिणीने शेअर केला हा नवा फोटो

रणवीर सिंगच्या सिनेमातील बहिणीने शेअर केला हा नवा फोटो

अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओना फॅन्स भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदेही परशुरामीच्याअभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे वैदहीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. नुकताच वैदहीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत वैदहीने डोक्यावर टोपी घातली आहे. तिचा वन साईड लूक यात दिसतो आहे. काही तासांच्यात आतच वैदहीच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेही परशुरामीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. वैदेहीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले होते.


रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा सिनेमात ती दिसली होती. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.

Web Title: Vaidehi parshurami looks gorgeous in her new photo