​वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरेची जोडी पुन्हा जमली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 15:33 IST2017-05-12T10:03:57+5:302017-05-12T15:33:57+5:30

वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहेरे यांची जोडी प्रेक्षकांना कॉफी आणि बरेच काही या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील ...

Vaibhav Linguist and Prayer Bharichi pair again | ​वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरेची जोडी पुन्हा जमली

​वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरेची जोडी पुन्हा जमली

भव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहेरे यांची जोडी प्रेक्षकांना कॉफी आणि बरेच काही या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील या दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटातील दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. कॉफी आणि बरेच काही या चित्रपटानंतर कॉफी आणि बरेच काही या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस यावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. वैभव आणि प्रार्थनाला या चित्रपटाच्या सिक्वलबाबत नेहमीच विचारले जाते. या चित्रपटानंतर त्या दोघांच्या फॅन फॉलॉव्हिंगमध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे.
वैभव आणि प्रार्थना कॉफी आणि बरेच काही या चित्रपटानंतर मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी या चित्रपटात देखील झळकले होते. या चित्रपटातील त्यांची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता वैभव आणि प्रार्थनाच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे. प्रार्थना आणि वैभव पुन्हा एकदा एका चित्रपटात एकत्र झळकणार आहेत आणि याबद्दल स्वतः वैभवने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून त्याच्या फॅन्सना सांगितले आहे. 
वैभवने त्याच्या ट्विटरच्या अकाऊंटवर प्रार्थनासोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोत त्याने म्हटले आहे की, खूप मोठ्या कॉफी ब्रेकनंतर मी प्रार्थनासोबत एक नवा चित्रपट करत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मी लवकरच सुरुवात करणार आहे.
वैभवने या चित्रपटाचे नाव काय असणार अथवा या चित्रपटात प्रार्थना आणि त्याच्याशिवाय कोण झळकणार या सगळ्याबाबत मौन राखणेच पसंत केले आहे. पण या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या दोघांच्या फॅन्सना या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागली आहे.   

Web Title: Vaibhav Linguist and Prayer Bharichi pair again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.