'मेगा क्लिन अप ड्राइव्ह'मध्ये 'वडापाव' सिनेमाच्या टीमचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 18:38 IST2025-09-20T18:38:23+5:302025-09-20T18:38:46+5:30

आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने मार्वे बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या 'मेगा क्लिन अप ड्राइव्ह' (Mega Clean Up Drive) या उपक्रमात ‘वडापाव’( Vadapav Movie )च्या टीमने समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली.

'Vadapav' movie team participates in 'Mega Clean Up Drive' | 'मेगा क्लिन अप ड्राइव्ह'मध्ये 'वडापाव' सिनेमाच्या टीमचा सहभाग

'मेगा क्लिन अप ड्राइव्ह'मध्ये 'वडापाव' सिनेमाच्या टीमचा सहभाग

आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने मार्वे बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या 'मेगा क्लिन अप ड्राइव्ह' (Mega Clean Up Drive) या उपक्रमात ‘वडापाव’(Vadapav Movie)च्या टीमने समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. समुद्रकिनाऱ्यावरील कचरा साफ करून पाण्याचं प्रदूषण, सागरी जलसृष्टीचं रक्षण आणि लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजिलेल्या या उपक्रमात दिग्दर्शक, अभिनेते प्रसाद ओक, गौरी नलावडे, रितिका श्रोत्री, शाल्व किंजवडेकर, निर्माते निनाद बत्तीन यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हा उपक्रम राबवल्यानंतर उपस्थितांनी 'वडापाव'चा आस्वादही घेतला.

या उपक्रमादरम्यान प्रसाद ओक म्हणाले,''या उपक्रमाच्या निमित्ताने ‘वडापाव’च्या टीमला अनोख्या पद्धतीने प्रमोशन करता आले. शूटिंगच्या गडबडीत, प्रमोशन्समध्ये अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी करण्याची संधी मिळत नाही, ती या निमित्ताने मिळाली. त्यासाठी निर्मात्यांचे आणि टीमचे आभार. आणि आमच्या या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनाचेही मनापासून आभार.''


एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनरअंतर्गत हा चित्रपट निर्मित झाला आहे. निर्माते अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन असून सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल आहेत. छायाचित्रण दिग्दर्शक संजय मेमाणे तर लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, गौरी नलावडे, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या भूमिका आहेत. येत्या २ ॲाक्टोबर रोजी ’वडापाव’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: 'Vadapav' movie team participates in 'Mega Clean Up Drive'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.