अंबरनाथ चित्रपट महोत्सवात वाल्या टू वाल्मिकीची मोहोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 12:41 IST2016-11-16T12:41:32+5:302016-11-16T12:41:32+5:30

           मराठी चित्रपटांनी नेहमीच अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांची मोहोर उमटविली आहे. मराठी सिनेमा आशयप्रधान असल्याचेही ...

Vaala-to-Valmiki blooms at the Ambernath Film Festival | अंबरनाथ चित्रपट महोत्सवात वाल्या टू वाल्मिकीची मोहोर

अंबरनाथ चित्रपट महोत्सवात वाल्या टू वाल्मिकीची मोहोर

 
       मराठी चित्रपटांनी नेहमीच अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांची मोहोर उमटविली आहे. मराठी सिनेमा आशयप्रधान असल्याचेही प्रेक्षकांनी सातत्याने सांगितले आहे. वैविध्यपूर्ण चित्रपटांच्या प्रभावी निर्मितीला प्रेक्षकवगार्ने नेहमीच मनापासून दाद दिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन मिळावे या हेतूने अंबरनाथमधील अंबरभरारी संस्थेने सुरु केलेल्या अंबरनाथ चित्रपट महोत्सवामध्ये यंदा वर्णन पिक्चर्स प्रस्तुत वाल्या टू वाल्मिकी या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेता, बालकलाकार व बालचित्रपट असे तीन पुरस्कार पटकावत या महोत्सवात आपली ठसठशीत मोहोर उमटवली आहे. वाल्या टू वाल्मिकी चित्रपटाला मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे - सर्वोत्कृष्ट बालचित्रपट- वाल्या टू वाल्मिकी, सर्वोत्कृष्ट अभिनेता झ्र मिलिंद शिंदे ,सर्वोत्कृष्ट बालकलाकार - वरुण बालिगा
१४ डिसेंबरला गावदेवी मैदानात रंगलेल्या अंबरनाथ चित्रपट महोत्सवात मिळालेल्या या पुरस्कारांबाबत निमार्ते श्रीकांत शेणॉय यांनी आनंद व्यक्त केला. श्रीकांत शेणॉय निर्मित, संजय कसबेकर आणि पंकज भिवाजी दिग्दर्शित वाल्या टू वाल्मिकी या चित्रपटात विचित्र परिस्थितीत अडकलेल्या माऊली या मुलाची कथा मांडली आहे. माऊलीच्या प्रवासात माऊलीला भेटणाऱ्या व्यक्ती त्याच्या आयुष्याला कशी कलाटणी देतात याची भावस्पर्शी कथा वाल्या टू वाल्मिकीचित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा-संवाद मनिष कदम यांचे असून छायाचित्रण राज रेवणकर यांनी केलं आहे. गीते प्रवीण दामले यांची असून अश्विन भंडारे यांचं संगीत चित्रपटाला लाभलं आहे. या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या शुभांगी शेणॉय आहेत. मिलिंद शिंदे, संजय खापरे, पंकज विष्णू, मौसमी तोंडवळकर, संजय कसबेकर, बालकलाकार वरुण बाळीगा यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Vaala-to-Valmiki blooms at the Ambernath Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.