शिंदे घराण्यातील एकुलत्या एक लेकीचा शाही विवाहसोहळा संपन्न; बहिणीसाठी उत्कर्ष शिंदेची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 14:34 IST2024-06-04T14:31:56+5:302024-06-04T14:34:55+5:30

शिंदे कुटुंब हे मराठी संगीत क्षेत्रातील ओळखीचं नाव

Utkarsh Shinde Shared Emotional Post On Wedding Of His Cousin Sister Swaranjali Shinde | शिंदे घराण्यातील एकुलत्या एक लेकीचा शाही विवाहसोहळा संपन्न; बहिणीसाठी उत्कर्ष शिंदेची भावुक पोस्ट

शिंदे घराण्यातील एकुलत्या एक लेकीचा शाही विवाहसोहळा संपन्न; बहिणीसाठी उत्कर्ष शिंदेची भावुक पोस्ट

शिंदे कुटुंब हे मराठी संगीत क्षेत्रातील ओळखीचं नाव. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी त्यांच्या गाण्यांनी रसिक प्रेक्षकांना अनेकदा ठेका धरायला लावला. लोकसंगीताचा वारसा लाभलेल्या या कुटुंबाचे राज्यासह देशभरात मोठा चाहतावर्ग आहे. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा वारसा चालवणारी शिंदे घराण्याची चौथी पिढी कायम चर्चेत असते. शिंदे कुटुंबातील एकुलत्या एक लेकीचा शाही विवाहसोहळा नुकताच संपन्न झाला. बहिणीच्या लग्नानंतर उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर भावूक पोस्ट केली आहे.  

उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात तसंच व्यावसायिक आयुष्याबद्दल विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतो. उत्कर्षची बहीण स्वरांजली शिंदे हिचे लग्न अलीकडेच पार पडले. स्वरांजली उत्कर्षच्या काकांची मुलगी असून एकूण १० भावडांची ती एकुलती एक बहीण आहे. त्यामुळे सर्वांसाठीच तिचं लग्न हा भावनिक क्षण होता.उत्कर्षने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लग्नाची खास झलक पाहायला मिळत आहे.

उत्कर्ष पोस्टमध्ये लिहलं, '१० भावांची एक बहीण. कर्तृत्ववान, सहनशील, समजूतदार, मायाळू, लहानपणापासून सगळ्याना जीव लावणारी आमची 'ताई'. लग्नात हजारो शुभचिंतक जरी होते, तरी आमची काकू ज्योती मिलिंद शिंदे ह्याना आम्ही मेजर मिस केलं. करोनामध्ये ती आम्हा सर्वांना सोडून गेली. काकूनंतर सर्वात लहान असून ताईने आईची जागा घेत भावांना, काकाला प्रेमाने सांभाळलं.'

उत्कर्ष पुढे लिहितो, 'खऱ्या अर्थाने भावांचं नाक उंच ठेवणारी आमची ताई. सक्षम, संवेदनशील, परिपक्व विचारांची... आमची मैत्रीण तर कधी काकू तरी कधी आमच्या आजीचं रुप घेणारी आमची ताई. तिच्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. कधीच टेन्शन घेऊ नकोस तुझे भाऊ नेहमी तुझ्यासोबत आहेत'. उत्कर्षच्या पोस्टवर आदर्शने कमेंट करत लिहलं, 'स्वरांजली कालचा दिवस हा फक्त तुझा होता. एका नवीन आयुष्याची सुरुवात होत असताना, तुझे भाऊ तुझ्या या प्रवासातही नेहमी तुझ्यासोबत आहेत. तुला खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद. तुझं पुढील आयुष्य सुख, समृद्धी आणि भरभराटीचे असो हिच प्रार्थना'. या पोस्टवर चाहत्यांनीदेखील कमेंट करत स्वरांजलीला शुभेच्छा दिल्या आहेत.
 

Web Title: Utkarsh Shinde Shared Emotional Post On Wedding Of His Cousin Sister Swaranjali Shinde